भारत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी विशेष प्रार्थना
अकोला
संत गजानन महाराजांच्या संजीवनी समाधी दिवसाची औचित्य साधून ऋषीपंचमीच्या पर्वावर भाजपा कार्यालयात गणेश उत्सव निमित्त गणपती अथर्वशीर्ष गण गणात बोते श्री गजानन जय गजानन मंत्र जाप सह पत्नी 27 जोडप्यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 2024 मध्ये पुन्हा सरकार येऊ दे तसेच शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी सुखी संपन्न व्हावा सर्वांचे आरोग्य चांगले राहावे भारत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी विशेष प्रार्थना अर्चना वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आली. कार्यक्रमाचे आरंभी अनुप धोत्रे यांनी गणेश पूजन केले.
यावेळीयज्ञेश जोशी, मोहन जोशी ,लोकश तिवारी, हरीश उपाध्याय, कृष्णा तिवारी यांनी विशेष पूजा अर्चना मंत्रोच्चार करून दोन तास भारतीय जनता पक्ष कार्यालयात धर्म आणि अध्यात्म तसेच परंपरा संस्कृती संवर्धन भक्ती कार्यक्रम आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या नेतृत्वात गणेश उत्सव निमित्त वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले असूनअक्षय जोशी, सागर शेगोकार, श्याम विंचनकर, संतोष डोंगरे प्रकाश धोगलीया, वैकुंठ ढोरे, मनीषा भुसारी सतीश येवले, उमेश गुजर, नाना कुलकर्णी जयंत मसने विजय अग्रवाल, चंदा शर्मा सुमनताई गावंडे संध्या, लोहपुरे, रश्मी कायंदे राजेश रिंगणे , माधव मानकर, गिरीश जोशी, अनुप धोत्रे संगीता मागटे , रमेश मागटे, सौ. स्नेहा ताई जोशी, सौभाग्यवती रीना ताई शेगोकार,साधना येवले छाया तोंड साम, संजय दिघोळ एडवोकेट देवाशिष काकड जानवी डोंगरे रंजना विंचनकर ,आरती धोगलीया , दुर्गाताई गुजर विजय इंगळे स्मिता ताई मानकर , अशा कडी डॉक्टर छाया मिश्रा, भाग्यश्री मापारी, प्रणिता सम्रतकर निशा कडी रविता शर्मायांनी पूजा अर्चना मध्ये भाग घेतला.
251 अथर्वशीर्ष पाठ करण्यात आले. तसेच गण गणात बोते जय गजानन श्री गजानन व सप्तऋषींना स्मरण करून भजन कीर्तन कार्यक्रम भारतीय जनता पक्ष कार्यालयात होऊन महाआरती विजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली.
21 सप्टेंबर रोजी दिव्यांची आरस
भारतीय जनता पार्टी कार्यालयात अकराशे अकरा दिव्यांची आरस कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता २१ सप्टेंबरगुरुवार रोजी करण्यात येणार आहे माहिती नाना कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या