Ticker

6/recent/ticker-posts

आमीष दाखवून फूस लावून पळून नेलेल्या बारा वर्षीय मुलाचा शोध लावण्यास शहर पोलिसांना यश

आमीष दाखवून फूस लावून पळून नेलेल्या बारा वर्षीय मुलाचा शोध लावण्यास शहर पोलिसांना यश


मुर्तीजापुर:प्रतिनिधी:- संतोष माने

 मुर्तीजापुर शहरातील भवानीनगर येथे राहणारे गजानन साहेबराव पाटील वय ५५ वर्षे यांनी त्यांचा पुतण्या ओम प्रल्हाद पाटील वय १२ वर्षे दिनांक १८/०९/२०२३ रोजीचे दुपारी १७/०० वा सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमीष दाखवुन फुस लावुन पळवुन नेले असावे अशा फिर्यादीचे जबानी रीपोर्ट वरून शहर पोलीस स्टेशनला अप नं. ३२०/२०२३ कलम ३६३ भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक भाउराव घुगे यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर गुन्हयाचा तपास स्वत:कडे तपासात घेवून घटनास्थळी भेट देउन, तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले.त्या प्रमाणे तपास पथकाने पो.स्टे. हददीतील तलाव विहीर यांची पाहणी केली.तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले. तसेच त्यांचे नातेवाईक यांना विचारपुस केली.परंतु कोणतीही माहीती मिळुन आली नाही. तदनंतर त्याच्या वडीलाचे फारकती झालेली आई कोठे राहते.बाबत तपास केला असता, काही पुरक माहीती मिळाली नाही. तपास पथक तयार करून ग्राम खेड पिंपरी ता.नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे येथे रवाना केले. तपास पथकाने मीळालेल्या माहीतीचे आधारे त्याचे फारकती झालेल्या आईचे वडील आजोबा मेघनाथ देशकर याचे घरी जावुन त्यांना विचारपुस केली असता,त्यांनी सदरचा मुलगा त्यांचे घरी काल रात्री आल्याचे सांगीतले. वरून तपास पथकाने ओम प्रल्हाद पाटील यास विचारपुस केली असता त्याची मोठी आई त्याला मारते म्हणुन त्याला आता तिचे कडे जायचे नसुन आजोबा मेघनाथ देशकर यांचे कडे राहायचे आहे.वरून पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी सदरचे मुलास त्याचे आजोबा च्या स्वाधीन केले.
सदरची कारवाही पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधीकारी मनोहर दाभाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भाउराव घुगे, पो.उप.नी गणेश सुर्यवंशी, पो. हवा संजय वाघ ब.नं. ११५२, पो. हवा सुरेश पांडे ब.नं. १०९९, पो.हवा नागोराव भांगे ब.नं. १५९१, पो.ना सचिन दांदळे ब.नं. १७४३, पो.ना मंगेश विल्हेकर ब.नं. १४६२, पो. कॉ. सचिन दुबे ब.नं. ८०८, पो. कॉ. गजानन खेडकर ब.नं. २१६५, पो.कॉ. जिवन अंभोरे ब.नं. ६६, पो. कॉ. हेमंत गर्जे ब.नं. २११७ यांनी पार पाडली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या