Ticker

6/recent/ticker-posts

लाठीचार्ज प्रकरणी वंचीत ने जाळला राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा

लाठीचार्ज प्रकरणी वंचीत ने जाळला राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा

अकोला: 
जालना येथील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज प्रकरणी वंचीत बहुजन आघाडी तर्फे अकोल्यात निषेध व्यक्त करण्यात आला. जालना जिल्ह्यातील सराटी येथे - मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, ही घटना अत्यंत दुर्दैवी व चुकीची आहे. या घटनेचा वंचीत बहुजन आघाडीने अकोला - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको आंदोलन करून राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. आवश्यकता नसताना ज्यांनी लाठीमार व गोळीबाराचा आदेश दिला त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे , आदी मागण्या यावेळी आंदोलनातून करण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 क्लिक करा


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या