Ticker

6/recent/ticker-posts

जालना मधिल आंदोलनकांवर लाठीचार्जचा अकोल्यात निषेध 

जालना मधिल आंदोलकांवर लाठीचार्जचा अकोल्यात निषेध 


सकल मराठा समाज आणि मराठा महासंघ अकोला जिल्हा तर्फे आज झालेल्या जालना जिल्ह्यातील सराटी येथे - मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व चुकीची आहे. त्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे, आवश्यकता नसताना ज्यांनी लाठीमार व गोळीबाराचा आदेश दिला त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. आज १ सप्टेंबर २०२३ अकोला येथील खुले नाट्यगृहासमोर जाहीर निषेध करण्यात आला. 


सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे शुक्रवारी रात्री अकोल्यात पडसाद उमटले अखिल भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा समाजातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर रास्ता रोको आंदोलन करीत अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध केला.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. दरम्यान १ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास सकल मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर येत आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत सकल मराठा समाज आणि मराठा महासंघ अकोला जिल्हा तर्फे आज १ सप्टेंबर २०२३ अकोला येथे जाहीर निषेध करण्यात आला, यावेळी सकल मराठा समाज आणि मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या