अकोला - अकोट जोडणाऱ्या गांधीग्राम येथील नवीन पुलासाठी १०० कोटी मंजूर
अकोला
मतदाराविषयी आपुलकी कर्तव्य तसेच सामाजिक दायित्व लक्षात घेऊन राजकारण पेक्षा समाजकारण व जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत विकासाचा संकल्प घेऊन कार्यरत असल्यामुळे आज केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून गांधीग्राम नदीवरील जुना पुल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी शंभर कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून तसेच गांधीग्राम ते किंनखेड फाटा पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता मंजूर करण्यात आमदार रणधीर सावरकर यांना यश मिळाले आहे नामदार नितीन गडकरी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार अकोले करांच्या वतीने आमदार सावरकर यांनी व्यक्त केले आहे.
गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल येथील खांबावर धोका निर्माण झाल्यावर आमदार सावरकर यांनी ताबडतोब खासदार संजय भाऊ धोत्रे व रेल्वेमंत्री वैष्णव राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून अकोला अकोट रेल्वे सुरू केल्यानंतर गांधीग्राम येथे तात्पुरता पूल निर्माण केला व नागरिकांना आर्थिक बचती सोबत वेळेची बचत ची सोय उपलब्ध करून दिली तसेच गांधीग्राम येथील नवीन पूल निर्मितीसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना सतरा शेतकऱ्यांसोबत चर्चा करून प्रशासकीय व त्यांची मान्यता घेऊन रस्ता सुरू केला व गोपालखेड मार्गे मार्ग सुरू केला आता या नवीन पुलासाठी सुद्धा शंभर कोटी उपलब्ध करून आमदार सावरकर यांनी विकास कामाला विरोध करणाऱ्या ंना कृतीने चपराक दिली आहे.
गांधीग्राम गावाजवळील पूर्णा नदीवरील जुना जीर्ण पुल काढून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 100 कोटी रुपये कामाला प्रशासकीय मंजूरी प्राप्त करण्यात आली आहे, आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाची गावकऱ्यांनी व 100 गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे
अकोला अकोट या राष्ट्रीय महामार्गावरील
पूर्णा नदीवरील गांधीग्राम गावाजवळील पूल ऑक्टोबर 2022 मध्ये खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खंडित झाली होती ,अकोला ते अकोट हा राष्ट्रीय महामार्ग 161/अ असून देशातील दक्षिण उत्तर राज्यांना जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे, वाहतूक खंडित होऊ नये याकरीता तात्पुरता पर्याय उद्देशाने एक छोटेखानी वळण मार्गाचा पूल तयार करण्यात आला होता, परंतु या मार्गावरील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री
खासदार संजय धोत्रे तसेच आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना साकडे घालून या ठिकाणी पूर्ववत पुलाची निर्मिती करून वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी निकालात काढावी याकरिता मागणी केली होती , या मागणीची दखल घेत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग विभाग मंत्रालय दिल्ली यांनी सदर कामासाठी सन् २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०० कोटी रुपयांचे कामाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे, सदर कामाचा आराखडा व नियोजन या बाबतीत आमदार रणधीर सावरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता कथलकर, उप अभियंता बागुल या अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली आहे, या कामासाठी विभागाकडून सुमारे ९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे, या कामामध्ये गांधीग्राम गावाजवळील जीर्णपुलाचे ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यासोबतच, गांधीग्राम ते कीनखेड फाटा यादरम्यान ३ किलोमीटर लांबीचे रस्त्यावर काँक्रिटीकरण तसेच सुमारे 16 मीटर रुंदीचा पूल तयार करण्यात येणार आहे , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 /ए वरील या भागात रस्त्याचे री अलाइनमेंट सोबत २ लेन चा रस्ता तसेच पेव्हड शोल्डर तयार करण्यात येऊन रस्त्याची दर्जीन्नती करण्यात येणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार संजय भाऊ धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे किशोर पाटील , विजय अग्रवाल जयंत मसने, बळीराम सिरस्कार आधीचे अभिनंदन केले आहे व आभार व्यक्त पंचक्रोशीतील नागरिकांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





0 टिप्पण्या