Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात 70 गावांना दळणवळणाची सुविधा

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात 70 गावांना दळणवळणाची सुविधा


अकोला
गुणवत्ता सोबत मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देतो परंतु अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने विकास कामांना गती देऊन सामाजिक व कर्तव्य पूर्तता करावी व ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा शिवसेना महायुती च्या काळात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात 70 गावांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध झालेल्या पहिल्या चरणाचा कार्यक्रम 
- दिनोडा येथे अकोला मरोडा ते दिनोडा ग्रामीण रस्ता क्र. ३९ कि.मी. ०/०० ते 1/०० रस्त्याची सुधारणा  
- लोतखेड येथे अकोला जिल्ह्यातील लोंतखेड पोच रस्ता ग्रामा – ७ कि.मी.०/०० ते ०/८०० रस्त्याची सुधारणा 
रोहणखेड येथे अकोला जिल्ह्यातील रुईखेड-पणज- सावरा – बाम्बर्डा – कुटासा – दहीहांडा रस्ता प्रजीमा ०४ रस्त्यावरील २५/०० ते २८/५०० (बाम्बर्डा ते कुटासा ) रस्ता सुधारणा
- कुटासा येथे अकोला जिल्ह्यातील रुईखेड-पणज- सावरा – बाम्बर्डा – कुटासा – दहीहांडा रस्ता प्रजीमा ४ कि.मी. २८/०० ते ३३/५०० ची रुंदीकारणासह रस्ता सुधारणा करणे तसेच रुईखेड-पणज- सावरा – बाम्बर्डा – कुटासा – दहीहांडा रस्ता प्रजीमा ४ कि.मी. ३३/५०० ते ४१/०० ची रुंदीकरणासह रस्ता सुधारणा
 कामाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेजराव थोरात हे होते.


विकास कामात भेदभाव न करता सामाजिक दायित्व म्हणून खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात मतदारांनी टाकलेला विश्वास वचनपूर्ती करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी वेगवेगळ्या फंडात च्या मार्फत निधी उपलब्ध करून अकोला पूर्व शहरी आणि ग्रामीण भागाचा नंदनवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य असून नामदार एकनाथ शिंदे नामदार अजित दादा पवार रवींद्र चव्हाण यांची सहकार्यामुळे दळणवळणाच्या सोयी सोबत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आपण कार्यरत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगून ग्रामीण भागातील नागरिक सणवार च्या काळात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारच्या पाठीशी उभे असल्याचा सिद्ध केले याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले.


जात-पात धर्म पेक्षा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे केवळ मताचा राजकारण न करता पक्षाने आणि ईश्वराने दिलेल्या संधीचा समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सावरकर सातत्याने प्रयत्नशील राहतात आणि त्यामुळे अकोला पूर्व मध्ये रस्त्यांचा विस्तारीकरण सोबत नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत असल्याचेही मधुकर पाटकर यांनी सांगितले.
या वेळेस राजेश नागमते, अशोकराव गावंडे, संदीप उगले, विठ्ठल भाऊ वाकोडे, सुभाष भाऊ मुकुंदे, मधुकर पाटकर, दत्तात्रय गावंडे,विजयसिंह सोळंके,रामेश्वर ढोक, बबलू टिकार, भरत काळमेघ, अनुप साबळे,निळकंठ राव नागरे, भजनराव कडू ,रज्जाक मौलानी, राजूभाऊ मौलाना, हरिभाऊ काळे, भीमराव बसू, संदीप सपकाळ, विशाल नागरे , प्रवीण अवार,सरपंच अन्नपूर्णा पोहेकर,विवेक भाऊ भरणे,बाळासाहेब झांबरे, अशोकराव झांबरे, अशोकराव गावंडे श्रीकृष्ण झाम्रे,राहुल भाऊ झांबरे, सरपंच विठ्ठल झांबरे, पंकज अशोकराव झांबरे, सुनील पाटील झांबरे, मिलिंद झांबरे, वासुदेव पाटील,सतीश सुतार सुभाष उमाळे सागर ढोक, उत्तमराव वाघमारे,गजानन सदाफळे, गजानन उगले पोलीस पाटील तसेच दिनोडा, लोतखेड, रोहनखेड, कुटासा भागातील असंख्य नागरिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या