ठाणेदारांनी विषारी सापाला दिले जीवनदान
प्रतीनीधी- नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सर्पाला पकडून जीवनदान दिले, वाघमारे शुक्रवार रोजी शांतता सभेसाठी जात असताना दरम्यान सायवणी येथे मोठा सर्प निघाल्याने गावकरी भयभीत झाले होते, त्याच वेळी वाघमारे यांनी स्वतः सर्पाला पकडले, सर्प पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्पाला जंगलात सोडून जीवनदान दिल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला
0 टिप्पण्या