वडगाव येथील आदिवासी नागरिकांना दूषित पाणी पाजणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..... रिपाई (ए)
मुर्तीजापुर प्रतिनिधी: संतोष माने
अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या वडगाव येथील भीषण पाणीटंचाई व दूषित पाणी पिण्याकरीता देत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. व दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निलंबित करा.अशी मागणी रिपाई आंबेडकर पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी, सीईओ व विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदनातून दिली. हकीकत अशी की, वडगाव येथील नागरिकांना अनेक दिवसापासून दूषित पाणी हेतू परस्परपणे तेथील पदाधिकारी व अधिकारी हे पाजत असल्याने रिपाई आंबेडकर पक्षाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, ठाणे जिल्हा महासचिव सचिन कोकणे यांच्या आदेशाने रिपाई आंबेडकर पक्ष मूर्तीजापुरच्या वतीने विभागीय आयुक्त अमरावती यांना संबंधितावर निलंबनाची कारवाई व्हावी.यासाठी तक्रार दिली. या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्यास संबंधितांच्या कार्यालयावर टाळेबंदी आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या दालनात जाऊन चर्चा केली असता विभागीय आयुक्त यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले. पाणी प्रश्न हा विषय गंभीर असल्यामुळे या संबंधित मुर्तीजापुर येथील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, जल सुरक्षारक्षक यांच्यावर कडक कारवाई करावी.अशा सूचना विभागीय आयुक्त यांनी संबंधित विभागांना दिल्या. ग्रामपंचायत प्रशासनाने व गटविकास अधिकारी यांनी संगणमत करून पाण्याचा मागील घेतलेला अहवाल हा योग्य असल्याचे दाखवून आदिवासी समाजाच्या लोकांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले आणि त्याच पाण्याचा अहवाल आरोग्य विभागांकडून घेतला असता हे पाणी दूषित असल्याचे अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे प्रशासन हे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालते काय? असा प्रश्न वडगाव येथील सर्वसामान्य जनतेत आहे. विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा महासचिव तथा अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे, जिल्हा महासचिव आनंद कोकणे, अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा सरदार, आयटीसी मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष उद्धव कोकणे, युवा तालुका अध्यक्ष संतोष कोकणे, शोभा शिंदे, सुशिलाबाई मांडवकर, अकोला जिल्हा उपाध्यक्ष आशिष वानखडे, शारदा इंगळे, मोहम्मद अथर, किशोर इंगळे, लक्ष्मी रताळे, पुष्पा रामटेके, सोनू मनोरे, स्वप्निल भटकर, इत्यादी कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.



0 टिप्पण्या