महिला पोलीस कर्मचाऱ्यान संपवीली जीवनयात्रा
अकोला : जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गीता नगरमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गीता नगरमधील बेला अपार्टमेंटमधील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. वृषाली दादाराव स्वर्गे वय ३५ आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत त्या कार्यरत होत्या. पतीचे निधन झाले आणि मूल-बाळ नसल्यामुळे आयुष्यात एकटीच राहिली, या आयुष्याला पूर्णपणे वैतागले आहे, म्हणून आज 'मी' आपलं जीवन इथेच संपवत आहे, अशाप्रकारे सुसाईड नोट लिहून पोलीस महिला कर्मचारी हिने आत्महत्या केली आहे. अशी माहीती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोला पोलीस दलात दुःखाचं वातावरण पसरल आहे. अपार्टमेंट मधिल महिलांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे दरवाजा वाजवून बघितला असता प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी जुने शहर पोलिसांना कळविले. जुने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली, दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता वृषाली मृत अवस्थेत आढळून आली. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.



0 टिप्पण्या