महानगरात छायाचित्रकारांची निघणार कॅमेरा दिंडी
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विशेष उपक्रम
सविस्तर वृत्त पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असो.च्या वतीने या वर्षीही जागतिक छायाचित्र दिन अनेक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शनिवार दि 19 ऑगस्ट सकाळी 9 वाजता स्थानीय राजेश्वर मंदिर पासून भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण छायाचित्रकारांच्या एकजुटीने प्रदर्शन घडविण्याच्या या दिंडीत छायाचित्रकार आपाल्या कॅमेरा व उपकरण समवेत या दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती असो.च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या दिंडीचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते होणार आहे व ही दिंडी राजेश्वर मंदिर पासून प्रारंभ होऊन जयहिंद चौक, मोठा पूल, सिटी कोतवाली, गांधी चौक, मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात येऊन या ठिकाणी या दिंडीचा समारोप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. छायाचित्रकारांचा आपसात सुसंवाद वाढावा, स्नेह वृद्धिगत व्हावे यासाठी असो.च्या वतीने छायाचित्रकार सदस्यासाठी दि 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता रिधोरा रस्त्यावरील हॉटेल तुषार येथे "स्माईल प्लिज" या वार्षिक आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अस्थीरोग तज्ञ डॉ अभय पाटील, जेष्ठ व्याख्याते प्रा सतिश फडके हे उपस्थित राहणार आहेत. छायाचित्रकारांच्या कुटुंबासाठी आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी,संगीत खुर्ची, दहीहंडी, कॅमेरा पूजन, पारंपरिक वेशभूष स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची धम्माल राहणार आहे. असो.च्या वतीने या छायाचित्र उत्सव सप्ताहात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन कोषाध्यक्ष योगेश उन्होणे यांनी केले आहे.



0 टिप्पण्या