Ticker

6/recent/ticker-posts

मुर्तीजापुरात दारूबंदीसाठी रणरागिणींचा यल्गार;महिला पोचल्या थेट 

मुर्तीजापुरात दारूबंदीसाठी रणरागिणींचा यल्गार;महिला पोचल्या थेट 


सरपंच उपसरपंच सदस्य व बचत गटाच्या महिलासह गावातील महिलांचा गावात सामूहिक दारूबंदीचा संकल्प


उपविभागीय अधिकारी संदीप अपार;उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना दिले निवेदन


मुर्तीजापुर प्रतिनिधी: संतोष माने

मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असून तरुण पिढी विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहे.अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत असून संसारात वितृष्ट निर्माण होऊन पती-पत्नी विभक्त होण्याचे प्रकार घडत आहेत. मातापित्यांवर हात उभारण्यापर्यंत व्यसनाधीन युवकांची मजल गेल्याची बिकट आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अवैध दारू, गुटखा,वरली,मटका, जुगार असे सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत.


यामुळे अल्पवयीन मुले विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहेत कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात कलह होत आहेत.गावातील सामाजिक सलोखा व शांतता धोक्यात आली आहे.कमी जास्त प्रमाणात सर्व तालुक्यात हाच प्रकार सुरू आहे.अवैधरित्या दारूच्या पेट्या घरपोच पोचविल्या जातात.अल्पवयीन, तरुणाई व संसारिक पुरुष दारूच्या आहारी गेल्यामुळे गट ग्रामपंचायत समशेरपुर खरब ढोरे जीतापूर नाकट येथे ग्रामसभेत सर्व उपस्थितांनुमते ठराव मंजूर करून संतप्त महिलांनी दारूबंदीसाठी मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी कार्यालय,उपविभागीय पोलिस अधिकारी,राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर धडक दिली. देशी,गावठी दारूची विक्री बंद करण्याची मागणी गट ग्रामपंचायत समशेरपुर खरब ढोरे जीतापुर नाकट येथील सरपंच मीना संजय वानखडे,यांच्या नेतृत्वात उपसरपंच उज्वला विष्णुदास खोत,सदस्यगण मीना गणेश थोप, दिपाली विद्यासागर आटोळे,पूजा राहुल नाईक, आरती दिनेश उमाळे,बाबाराव आनंदा वानखडे आदींच्या मार्गदर्शनात पल्लवी विकी मारवाड,रंजना जगन मारवाड,साहना कैलास मारवाड,अनिता परेश मारवाड, शोभा मारवाड,सुनिता साजन घोसले,संजीवनी स्वप्नील तायडे,लक्ष्मी संतोष मुंडे,मंगला विनोद आठवले,शोभा शामराव ढोरे,गोदावरी वसंतराव थोप, रंजना नरेश सदार,जोशना दिलीप थोप,मालुबाई ढोरे या महिलांनी केली आहे.


तालुक्यातील ग्रामिण पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 82 खेडेगावे येतात. या खेडेगावात देशी दारूच्या दुकानावरून देशी दारूचे बॉक्स येतात. या दारूची बेकायदा वाहतूक आणि विक्री ही खुलेआम करण्यात येते. अल्पवयीन मुले देशी दारूच्या आहारी गेल्यामुळे संतप्त महिलांनी दारूबंदीसाठी मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर धडक दिली. देशी, विदेशी गावठी दारूची विक्री बंद करण्याची मागणी या वेळी निवेदनातून करुन दारूचे बॉक्सचे बॉक्स विविध खेडेगावात खुलेआम जातात तरी कसे? त्यांना सुरक्षा कवच कोणाचे आहे ? असा सवाल उपस्थित महिलांनी केला.
ग्रामीण भागातील देशी, निर्मुलन समितीत विदेशी गावठी दारूची विक्री बंद करावी,अशी मागणी या महिलांनी केली. पोलिस अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाई तर करतात पण तेही नकळत, त्यानंतरही अवैध दारू विक्रेत्यांनी तोंड वर काढले आहे.अवैध धंदे करणाऱ्यांना धाकच नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने अखत्यारीतील विभागाला याबाबत जाब विचारून अलर्ट राहण्याचे आदेशित करावे, अशी मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे.


गट ग्राम पंचायत समशेरपूर येथील मासिकसभा सरपंच सौ. मीनाताई संजय वानखडे यांच्या अध्यक्षते घेण्यात आली असता सभेत ग्रामपंचायत समशेरपूर, मौजे जितापूर नाकट व खरब ढोरे या गावामध्ये मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले असून यामुळे महिला व शाळकरी मुली, मुले यांना मोठया प्रमाणात शाररीक तसेच मानसीक त्रास होत असल्यामुळे आजची सभा सर्वांनुमते असे ठरविते की गट ग्राम पंचायत समशेरपूर अंतर्गत असलेले मौजे समशेरपूर, मौजे जितापूर नाकट व खरब ढोरे या ठिकाणी असलेले अवैध धंदे बंद करण्यात येवून अवैध धंदे करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. असे सभेत ठरवून सदर विषयाबाबत वरीष्ठ कार्यालयाने विषयाचे गांभीर्य ओळखून अवैध धंदे करण्याऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करुन महिला, शाळकरी मुली व मुले यांना होणाऱ्या त्रासाचे निरसन करावे व भविष्यात यापूढे अवैध धंदे होणार नाहीत या बाबत योग्यती कारवाही करावी. असे सभेत ठरवून सर्व उपस्थीतांनुमते ठराव मंजूर करण्यात आला.


अल्पवयीन शाळकरी मुले सुद्धा दारूच्या आहारी गेल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत.दारूमुळे गावातील कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.महिलांना संरक्षण देखील नाही. पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गट ग्रामपंचायत समशेरपुर,खरब ढोरे,जीतापूर नाकट या गावातील देशी विदेशी व गावठी दारू सह अवैधधंदे तात्काळ बंद करावी.अन्यथा आम्हा सर्व महिलांना रस्त्यावर उतरावे लागेल.मीनाताई संजय वानखडे, सरपंच गट ग्रामपंचायत समशेरपुर


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या