कला शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात निवेदन
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाची सभा दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी पार पडली त्या सभेत ठरल्याप्रमाणे रंगभरण व चित्रकला स्पर्धा यांची परवानगी मिळावी, शिक्षकांच्या कार्यशाळेस परवानगी मिळावी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी परवानगी मिळावी व मान्यताप्राप्त संघटने व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघटनेला स्पर्धा कार्यशाळा व इतर उपक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, तेव्हा मान्यता प्राप्त असलेल्या संघटनेस प्राधान्य देण्यात यावे. कला विषय संदर्भात इतर कोणत्याही प्रकारचे उपक्रम असल्यास मान्यता प्राप्त संघटनेला विश्वासात घेण्यात यावे या सर्व उपक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आपणासोबत नेहमीच असेल शाश्वती देण्यात आली.
याशिवाय कला विषयाचा कार्यभार लक्षात घेता कलाशिक्षकांच्या नेमणुका करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कलाशिक्षक अतिरिक्त ठरवणे याबाबत माननीय संचालक श्री कृष्ण कुमार पाटील उपसंचालिका डॉक्टर आवटे मॅडम प्रशासन अधिकारी माननीय दीपक माळी त्या विभागाच्या प्रमुख माननीय भक्ती जोशी मॅडम व त्या कार्यालयातील अन्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
चर्चेत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार माननीय पी. आर. पाटील सर माजी सरचिटणीस व विद्यमान सल्लागार एम.ए. कादरी सर, माजी उपाध्यक्षा व स्थायी समिती सभापती पुणे महानगरपालिका सौ अश्विनी कदम मॅडम महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बारई सर, उपाध्यक्ष बलराम सामंत सर, सरचिटणीस दिगंबर बेंडाळे सर, खजिनदार विजयसिंह ठाकूर, सह सचिव प्रकाश पाटील सर, कलाशिक्षिका, पुणे जिल्हा, निताली मॅडम व इतर कलाशिक्षक यांनी आपला सहभाग नोंदवला चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अशी माहीती संजय आगाशे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे अमरावती विभाग यांनी पत्राद्वारे कळवीली आहे.
0 टिप्पण्या