Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था कान्हेरी सरप अकोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था कान्हेरी सरप अकोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा


अकोला . औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T .I) कान्हेरी सराफ येथील संस्थेचा निकाल 95 टक्के लागला यासाठी संस्थेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चोपडे साहेब (व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी), श्री ठाकरे साहेब (आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शक अधिकारी), श्री ठोकरे साहेब (प्राचार्य. औ. प्र. संस्था अकोला), श्री रत्नपारखी साहेब (प्रकल्प अधिकारी अकोला) श्री घोंगडे साहेब (उप प्राचार्य औ. प्र. संस्था अकोला), श्री मंगेश पुंडकर साहेब (कौशल्याचार्य गटनिर्देशक औ. प्र. संस्था) पूजा कडूकार ( उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र अकोला) रोहित पारस्कर (अण्णासाहेब पाटील विकास मंडळ) इत्यादी लाभले होते. तर अध्यक्षस्थानी श्री राहुल देशमुख (श्री कमलाबाई देशमुख औद्योगिक संस्था अध्यक्ष), तर उपाध्यक्षपदी संस्थेचे प्राचार्य श्री उमेश लांडे सर हे होते. 


 नुकताच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल जाहीर झाला यामध्ये संस्थेचा निकाल 95% लागला तर या संस्थेतून वैभव राठोड विशाल बोडे, प्रथमेश मोहकार ,नंदन नवलकर, प्रशांत उ, संतोष सोळंकी, ऋषिकेश उगले ,गोपाल घाटे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री चोपडे साहेब यांनी औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर रोजगार व स्वयंरोजगार अशा दोन्ही संधी औद्योगिक प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात असे श्री ठाकरे साहेब यांनी सांगितले. तर उद्योग उभारून तुम्ही दुसऱ्यांना नोकरी देणारे ठरू शकता.तर आयटीआय झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतर उद्योगासाठी लागणारे भांडवल याची माहिती श्रीरत्नपारखी साहेब यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चांदूरकर सर यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे श्रीअशोक देशमुख सर प्राध्यापक श्री गीते सर श्री निकोले सर, श्री गोंडाने सर श्री ठाकरे सर , सागर तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या