राज्य शासनाच्या परिपत्रकात तसा उल्लेख
आ देशमुख गोरगरिबांची दिशाभूल करणे थांबवा - तेजराव थोरात
अकोला
ओबिसी घटकातील गोरगरीब लोकांना गेल्या कित्येक वर्षापासून घरकुलासाठी पात्र असताना स्वतंत्र घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ मिळत नव्हता नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,अजितदादा पवार यांनी मंत्री मंडळाची बैठक घेऊन ओबिसी घटकातील गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकार कडे मागणी केली होती परंतु केंद्र सरकारने राज्य सरकारला स्वतः राज्याच्या निधीतून ओबिसी साठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचे सूचित केले होते त्यानुसार राज्य सरकारने ओबिसी घटकातील लोकांना तीन वर्षात १० लक्ष घरकुलाचा लाभ देण्याची योजना हाती घेतली असून ज्या गोरगरिबांचे घराचे स्वप्न मालकीची जागा उपलब्ध नाही म्हणून अपूर्ण राहील अशा लाभार्थ्याना जागा घेण्यासाठी ५० हजार रूपये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून अर्थसहाय्य करण्याची योजना राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे असे असताना बाळापुर चे उबाठा गटाचे आमदार नितिन देशमुख यांनी फुकटचे श्रेय लाटण्यासाठी उद्या शासकीय विश्राम गृह अकोला येथे स्वमालकीची जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्याना शासनाने जागा उपलब्ध करून देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे आमदार नितिन देशमुख तुम्ही आयोजित केलेली बैठक गोरगरिबांची दिशाभूल करणारी आहे कारण राज्य सरकारने तुमच्या बैठकीच्या आधी जागा नसणाऱ्या लोकांना घरकुलासाठी लागणाऱ्या जागेसाठी अर्थसहाय्य देण्याची तरतूद ओबिसी साठी घरकुल योजना तयार करण्यापूर्वी केली आहे विनाकारण गोरगरीब जनतेची दिशाभूल करू नका असा सनसनित टोला भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य तेजराव थोरात यांनी लगावला असून ओबिसी सोडून इतर समाजातील लोकांना मिळणाऱ्या योजनेत देखील जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थ्याना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिन दयाल उपाध्याय योजनेत अर्थ सहाय्य देण्याची तरतूद याच परिपत्रकात नमूद केली आहे.
आमदार नितिन देशमुख आपण सत्तेत असताना बाळापुर विधानसभा मतदारसंघातून जिल्हयाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही रस्त्याचे काम केलं नाही आपल्याला विकास कामापेक्षा कशात जास्त रस आहे हे विधानसभा मतदारसंघातील जनता ओळखून आहे त्यामुळे राज्य सरकारने ओबिसी घटकातील गोरगरीब लाभार्थ्याना मिळणाऱ्या घरकुल योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये आणि बैठका घेऊन शिळया कळीला ऊत आणु नये तुम्हाला बाळापुर विधानसभा मतदारसंघातील जनता चांगल्या ठप्रकारे ओळखत असल्याचा टोला देखील यावेळी थोरात यांनी लगावला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या मोदी आवास प्लस योजनेत स्वतः ची जागा नसलेल्या लाभार्थ्याना क्रांतीज्योती सावित्री फुले व पंडित दिन दयाल उपाध्याय योजनेत मिळणार आर्थिक सहाय्य
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या