हार्ट बीट कॅफेवर करण्यात आली सीलची कारवाई
अकोला- महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत रणपिसे नगर येथील हार्टबिट कॅफे मध्ये मुला, मुलींना असभ्य वर्तन करतांना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाव्दारा सदर कॅफेचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. परंतू सदर कॅफे धारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसून त्यांना बाजार/परवाना विभागाव्दारे सदर कॅफे बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू सदर व्यावसायिकानी आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे व उपद्रव आढळून आल्याने आज दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी मनपा पुर्व झोन कार्यालय, मनपा बाजार/परवाना विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तीक कारवाई करून नियमानुसार सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी बाजार/परवाना विभाग प्रमुख राजेश सोनाग्रे, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बालोद, ए.एस.आय.किशोर आठवले, बाजार/परवाना विभागाचे सुरेंद्र जाधव, गौरव श्रीवास, संजय पाचपोर, रविंद्र निवाने, निखील लोटे, पुर्व झोन कार्यालयाचे पंकज पोफळी तसेच सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या