Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांनी आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या अविलंब निकाली काढाव्यात- आ. अँड किरणराव सरनाईक

शिक्षणाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांनी आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या अविलंब निकाली काढाव्यात- आ. अँड किरणराव सरनाईक


अकोला : अकोला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शुक्रवार दि. 25/8/2023 रोजी स्थानिक सीताबाई कला महाविद्यालय, अकोला येथे शिक्षकांच्या सभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
        अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे सदस्य असलेले शिक्षक आमदार अँड.किरणराव सरनाईक हे सभेच्या अध्यक्ष स्थानी होते,तर यावेळी अकोला शिक्षणाधिकारी (माध्यामिक) डॉ. सुचिता पाटेकर,वेतनपथक (माध्यमिक) अधिक्षक झापे, वेतनपथक अधिक्षक (प्राथमिक ) तेलमोरे,लेखाधिकारी पुंडकर, विस्तार अधिकारी टेकाडे, जाधव व संबधित विभागाचे अधिकारी होते.सर्वप्रथम शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांनी शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच यावेळी विविध शिक्षक संघटनेच्या वतीने सुद्धा आपल्या लाडक्या नेत्याचे लोकप्रिय आमदार अँड किरणराव सरनाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री जय बजरंग व्यायाम मंडळ नेहरूर नगर मोठी उमरी अकोलाचे मार्गदर्शक संजय कडोळे,अध्यक्ष प्रदिपराव सोनोने, पदाधिकारी सुभाष ढोरे,मंगेश टोपरे यांच्या कडूनही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले, यावेळी अमरावती विधान परिषद मतदार संघाचे शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी नुकतेच पार पाडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागातील विविध समस्यांना विधान परिषदेमध्ये प्रभावीपणे सादर करून शासनाला जाब विचारलेला असल्याचे स्पष्ट केले. अकोला जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या समोर यावेळी आधार वैधता,संच मान्यता दुरुस्ती, सातवा व सहावा वेतन आयोग हप्ते,वरिष्ठ व निवड श्रेणी अरिअर्स,भ.नि.नी.,वैद्यकीय प्रलंबित देयके,अकरावी प्रवेश, एनपीएस खाते तसेच पावत्या वितरण,नवीन शाळांचे अनुदान आदेश वितरण,शालार्थ प्रस्ताव, इत्यादी अनेक समस्या या सभेमध्ये मांडण्यात आल्या. अनुदान आदेश वितरणासंदर्भात डॉ.सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी यांनी सहकार्याचे धोरण दाखविले नाही.मात्र शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी याबाबतीत सर्वतोपरी प्रयत्न करून नवीन 20% अनुदानित शिक्षकांना तसेच टप्पा वाढ अनुदानित शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सुचवीले. आ.अँड सरनाईक याांनी या सर्व समस्या अनुक्रमाने मांडून डॉ सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी, व उपस्थित त्यांचे संबधित अधिकारी यांना स्पष्टीकरण विचारले. तसेच ज्या काही समस्या प्रलंबित आहेत त्या भविष्यात राहू नये.याबद्दल सुचित केले.यावेळी बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींनी त्यांच्या वैयक्तिक समस्या सुद्धा या ठिकाणी सादर केल्या.यामध्ये अनुकंपा तत्वाखाली पात्र असलेल्या भगिनी तसेच अतिरिक्त ठरलेले कर्मचारी उपस्थित होते.या समस्यांचा सुद्धा निपटारा करण्यासाठी आ.अँड किरणराव सरनाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचित केले.तसेच निवृत्त कर्मचारी सुद्धा यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.


यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे सर, दिलीप कडू,कार्याध्यक्ष मु.अ. संघ,नरेंद्र लखाळे, बंडू अत्रे, शिक्षक सेलचे संजय देशमुख, पंकज अग्रवाल, विभागीय अध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघ, संजय गायकवाड, विभागीय पदाधिकारी अमरावती विभागीय शिक्षक संघ, पद्माकर देशमुख, प्रा.नरवाडे श्रीकृष्ण भाऊ वक्ते, दीपक बिरकड, जिल्हाध्यक्ष अमरावती विभागीय शिक्षक संघ, विजय अग्रवाल, भोरकडे, कु चक्रे मॅडम, महिला जिल्हाप्रमुख राजेश देशमुख सर,संदीप जढाळ सर,डॉ के बी देशमुख सर तसेच अनेक सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनी कर्मचारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर व त्यांच्या कर्मचारी वृंदांनी उपस्थितांचे शंका निरसन केले व आ.अँड किरणराव सरनाईक यांना अशी ग्वाही दिली की भविष्यात शक्य तेवढ्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न कार्यालयातून केला जाईल. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनी समाधानाची भावना व्यक्त केली. आ.अँड किरणराव सरनाईक यांनी यावेळी सर्व उपस्थितांना आवाहन केले की, 
भविष्यातही आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सादर कराव्यात.यावेळी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे सचिव भास्करराव सोनूणे सर यांनी आपल्या समारोपिय भाषणातुन उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना अमरावती विभागीय शिक्षक संघ अमरावती यांचेकडून कळविण्यात आले आहे.

क्षणचित्रे .....!🌀 अकोला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी यशस्वी सभेचे आयोजन🌀*
---------------------------------------------
*🔹मा. किरणराव सरनाईक यांनी सर्वतोपरी प्रयत्नाने टाकला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर प्रकाश 🔸*
---------------------------------------------
*🔹 सीताबाई आर्ट्स महाविद्यालयात शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभेला उपस्थिती 🔸*
---------------------------------------------
*🔹मा.डॉ सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, झापे साहेब वेतन पथक अधीक्षक,माध्यमिक, तेलमोरे, वेतन पथक अधीक्षक, प्राथमिक, पुंडकर साहेब, लेखाधिकारी, टेकाळे, जाधव, विस्तार अधिकारी,यांनी स्पष्टीकरण देऊन समस्या सोडविण्यासाठी केले आश्वस्त.🔸*
---------------------------------------------
*🔸जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा🔹*
-----------------------------------

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या