देवी देवतांना वाहिलेले फुल व निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यरथ
अकोला
सामाजिक व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने नागरिकांशी संवाद साधून सतत त्यांच्या समस्येची एकरूप होऊन प्रामाणिकपणे दूर करण्यासाठी कटिबद्ध असणारे भाजपा चे माजी महानगराध्यक्ष व माजी महापौर विजय अग्रवाल व प्रभाग तेराच्या नगरसेविका सुनीता देवी विजय अग्रवाल सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनतेला सुविधा उपलब्ध करून देतात याच दृष्टीने त्यांनी चातुर्मास चे महत्व हिंदू धर्मात असून या काळात गणपती दुर्गा महागौरी दसरा दिवाळी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरणाविषयी जागृत असल्यामुळे त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने सामाजिक, राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वसामान्यांचे आवडते नगरसेवक व नेते विजय अग्रवाल व सुनिता देवी अग्रवाल यांनी प्रभाग पाच आणि प्रभाग 13 या भागातील नागरिकांना देवी देवतांना वाहिलेले फुल व निर्माल्य टाकण्यासाठी दूर जावा लागणार नाही व वेळेची व आर्थिक बचत व्हावी तसेच निर्माल्याचा योग्य ठिकाणी विसर्जन व्हावा या दृष्टीने निर्माल्यरथ निर्मिती करून प्रभाग पाच आणि 13 मधील प्रत्येक गल्ली मध्ये फिरून जमा करणार आहे. याचा लाभ अकोला पूर्व भागातील प्रभाग तेरा व प्रभाग पाचच्या नागरिकांनी घ्यावा अशी विनंती अग्रवाल यांनी केली आहे
0 टिप्पण्या