बालविवाह,बाल लैंगिक शोषण व बाल तस्करी या विषयावर जनजागृती
एकाच वेळी 800 जणांनी घेतली शपथ बाल विवाह मुक्त भारत करण्याची शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित व उत्कृष्ट प्रतिसाद
मुर्तीजापूर
आज दि.०८ ऑ२०२३ रोजी पंचशील विद्यालय आणि जि.एम.टेकाडे जुनिअर कॉलेज कुरुम येथे असेस टू जस्टीस व इंडिअन सोसलं वेल्फेअर सोसायटी अतर्गत चालू असलेल्या बाल विवाह ,बाल लैगिग शोषण व बाल तस्करी या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरुसे होते.आणि कार्याक्रमचे अध्यक्ष प्राचार्य विशाल भीमराव पोजगे पर्यवेक्षक पुष्पा दिलीप गादे आणि सहायक शिक्षक विजय श्रीपतराव पराते होते. त्या वेळी अकोला जिल्ह्यातील असेस टू जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. आणि माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सुद्धा आपला बचाव व आपली सुरक्षा कसी करावी,या बद्दल मार्गदर्शन केले. आणि पराते सरांनी सुद्धा अमूल्य माहिती सांगितली. व गावातून फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली.एकाच वेळी बाल विवाह मुक्त भारत करण्याची 800 जणांनी शपथ घेतली.
इंडिअन सोसलं वेल्फेअर सोसायटचे डारेक्टर बेलेकर सरांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा व मुर्तीजापूर तालूक्यातील जिल्हा समन्वयक वाघमारे, शुभांगी लहुरकर,सी एस डब्लु रवींद्र सावरकर,समाधान वानखडे,मोहिनी चौधरी,दर्शन सिनापुरे,वैशाली नेमाडे व सर्व स्शिक्शिषक व कर्म चारी उपस्तीत होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या