Ticker

6/recent/ticker-posts

जुने शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवघ्या दोन तासात हत्यारे जेरबंद 

जुने शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवघ्या दोन तासात हत्यारे जेरबंद 



जुने शहर पोलीसांनी खुनातील आरोपींना अवघ्या ०२ तासात अटक केली आहे. पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी न्यू हिंगणा फाटा परिसरात शेख शाहरूख शे. हसेन वय ३०, रा. सोनटक्के प्लॉट या युवकाची दगडाने ठेचून हत्या केली. हत्या करणाऱ्या गुन्हयातील आरोपी नामे अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर राहणार न्यू हिंगणा अकोला आणि अभिजीत वानखडे राहणार कळम्बेश्वर अकोला यांना अवघ्या दोन तासात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दुधगावकर यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरिक्षक नितीन लेव्हरकर, रविंद्र लांडे, प्रदिप घटे, रविंद्र करणकार, संतोष मेंढे, शैलेष पाचपोर, छोटु पवार, सागर शिरसाट, पंकज सुर्यवंशी, पवन डांबलकर, शाम पोधाडे, अर्जुन खंडारे यांनी केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या