Ticker

6/recent/ticker-posts

घरकुलाच्या मुद्द्यावर आमदार देशमुख यांचे आंदोलन पब्लिसिटी स्टंट- अश्विन नवले

घरकुलाच्या मुद्द्यावर आमदार देशमुख यांचे आंदोलन पब्लिसिटी स्टंट- अश्विन नवले

अकोला:
घरकुलांच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख 9 ऑगस्टला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले संदीप यांनी केली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते स्वतः सत्तेत असताना व त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अकोला जिल्ह्यातील घरकुलांचा मुद्दा कधीही सभागृहात उपस्थित केला नाही. आतापर्यंत त्यांना कधीही गोरगरिबांची किंवा त्यांच्या घरकुलांची आठवण झाली नाही. आता अचानक अकोला जिल्ह्यातील गोरगरीब घरकुलांपासून वंचित असल्याचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. त्यातून त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. हा मोर्चा म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच होऊ घातलेल्या घरकुलांच्या बांधकामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याच अश्विन नवले यांनी सांगितले.

अश्विन नवले, जिल्हा प्रमुख, शिवसेना (शिंदे गट), अकोला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या