डाॅ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृती दिनी निर्भय मॉर्निंग वॉक करुन विवेकाचा जागर
अकोला — महाराष्ट्र अंदश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा प्रबोधन चळवळीतील कृतीशील विचारवंत शहीद डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आज अकोला जिल्हा महाराष्ट्र अंनिस चे वतीने निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन करुन विवेक जागर करण्यात आला . शहरातील अशोका वाटीका येथे तथागत गौतम बुध्द, डाॅ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना अभिवादन करन सकाळी ७ वाजता निर्भय मॉर्निंग वॉकची सुरुवात करण्यात आली. यावेळेस डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे तपासात होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईचा निषेध करून खुनामागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. डाॅ नरेंद्र दाभोलकर अमर रहे च्या घोषणा देत समारोप करण्यात आला. महादेवराव भुईभार यांनी डाॅ. दाभोलकरांच्या खुन्याचा शोध घेण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. तर प्राचार्य डाॅ.सुभाष भडांगे यांनी विवेकी विचार समाजात रुजविल्याशिवाय समाजोन्नती शक्य नसल्याचे प्रतिपादन केले. अंधश्रध्दा निर्मूलन ही काळाची गरज असल्याचे मत डाॅ.नितीन देऊळकर यांनी व्यक्त केले.
प्रा. डाॅ.संजय तिडके यांनी सर्व उपस्थीतांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्रअंनिस चे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, माजी प्राचार्य डाॅ.सुभाष भडांगे, जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके. जिल्हाअध्यक्ष अर्जूनराव गुडधे, प्रा. नितीन देऊळकर, गजानन ढाले, विद्याताई राणे, सविताताई शेळके. अजय वानखडे बोरगाव, संजय पाटील झाडोकार, दामोधर, रोहन बुंदेले आदी कार्यकर्ते उपस्थित हीते.
0 टिप्पण्या