मध्य प्रदेश मध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येणार - आमदार रणधीर सावरकर
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व क्षेत्राचा विकास झाला असून मध्य प्रदेशात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम वेगवेगळ्या योजना सुरू करून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सर्व क्षेत्राचा विकास करून सर्वसामान्यांचे सरकार असल्याची कृतीने सिद्ध केले आहे मध्य प्रदेश मध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येणार असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
देशभरातील सर्व आमदारांना वेगवेगळ्या प्रदेशात जिथे निवडणूक आहे तिथे पाठवून कार्यकर्ते तसेच मतदारांची सुसंवाद साधण्याचा निर्णय या दृष्टीने आमदार सावरकर मध्यप्रदेश मधील भैहदी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे आमला,झल्लार आणि धामणगाव गावातील नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा लोकप्रतिनिधी साधा आणि सरळ व जनतेशी एकरूप असणारा असल्याचा प्रत्येक देशभरातील वेगवेगळ्या मतदार संघातील नागरिकांना व्हावा या उद्देशाने व पक्षाचा आदेश मानून विस्तारकाची भूमिका करू शकतो हे दाखवण्यासाठी तसेच देशभरातील मतदारांचा मूड व पंतप्रधानाविषयी असेल असलेली आपुलकीची भावना सरकारच्या कामकाजाबद्दल मत सरकारच्या योजनेमधील येणाऱ्या अडचणी हे समजून घेण्यासाठी व आपल्या मतदारसंघात व जिल्ह्याच्या पद्धतीने आपण काम करतो त्याच पद्धतीने देशभरातील नागरिकांच्या प्रचाराची मुद्दे प्रचाराची पद्धत विजयाची कौशल्य विजयाचा मंत्र कार्यकर्ता पर्यंत पोहोचवण्यासाठी उत्साह निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा संघटन सरचिटणीसांनी ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत देशभरातील आमदार वेगवेगळ्या मतदार संघात भाषा वेगळी संस्कृती एक राष्ट्र एक ही भावना जपण्यासाठी भारत समृद्ध भारत एक संघ भारत व भारतामध्ये फूट पाडून जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या तत्त्वापासून सावध राहण्यासाठी भारतीय भावना जागृत करण्याच्या दृष्टीने हे अभियान सुरू केले आहे. आमदार सावरकर भैदही या विधानसभा मतदारसंघात मतदाराची सुसंवाद साधत आहे.
मतदारांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त करून सरकारच्या कामकाजाची प्रचार प्रसार सतत आठ दिवस या मतदारसंघात नागरिकाशी आमदार सावरकर सुसंवाद साधणार आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या