भाजप माजी नगरसेवकाचा प्रताप, विनापरवानगी सार्वजनिक शहरात लावले फलक भाजप जनप्रतिनधीचे बोर्ड !
गुन्हे दाखल करण्याची वंचित युवा आघाडीची महापालिकेस मागणी
अकोला दि. ०८
अकोला महापालिका पालिका कार्यक्षेत्रात संपूर्ण शहरात भाजपा माजी नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी चौका चौकात फक्त भाजपचे जनप्रतिनिधीच्या विनापरवानगी पाट्या लावल्या आहे. शहर विद्रुपीकरण आणि स्वस्त प्रसिद्धीची हौस पुरी करणा-या पाट्यांविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडी ने आज महानगरपालिका उपायुक्त गीता ठाकरे यांचे दालन गाठुन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ह्या वेळी वेगवेगळ्या चौकात अतिक्रमण करून विनापरवाना लावण्यात आलेल्या पाट्यांचे फोटो दाखवुन प्रश्नांची सरबत्ती केली.ह्या पाट्यांचा मनपा ने ठराव घेतलाय का...? ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय का...? दोन महिन्यांपासून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई का केली नाही......? ह्या वर उपायुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मुळात हा खर्च कुणी केला आहे आणि एकाच पक्षाचे पदाधिकारी ह्यांची नावे लावण्यास परवानगी कुणी दिली ह्याचा शोध घेतला जावा अन्यथा मनपा प्रशासन भाजपाचे बटीक झाले आहे, असाच संदेश शहरात जाईल, असा आरोप करत भाजपाचे माजी नगरसेवक अनिल मुरुमकार यांच्या वर गुन्हे दाखल करा अन्यथा तिव्र आंदोलन करू.सोबतच वंचित आघाडी युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, युवा शहर अध्यक्ष जय तायडे आणि आशिष मांगुळकर व इतर पदाधिकारी कुठे राहतात त्याच्या पत्ता, मोबाईल क्रमांक गुगल मॅपसह मनपा बिल्डिगच्या दर्शनी भागात लावण्याचा इशारा वंचित युवा आघाडीचे दिला आहे.
ह्यावेळी पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर यांनी छायाचित्रे असलेले पुरावे सादर केली.
वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर,जिल्हा सचिव आनंद खंडारे, ,संघटक रितेश यादव, प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, आकाश गवई, वैभव खडसे, शेखर इंगळे,नम्रता आठवले, आशिष सोनोने,मनोज इंगळे, राजेश बोडदे, आशिष सरपाते, विजय बोदडे, साहिल आठवले,
मनोज बागडे,प्रवीण खंडारे, शिरीष आव्हाड, महेश शर्मा, सचिन शिराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या