Ticker

6/recent/ticker-posts

आपत्ती व्यवस्थापन, NDRF व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुरामध्ये अडकलेल्या 30 नागरिकांचे वाचविले प्राण 

आपत्ती व्यवस्थापन, NDRF व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुरामध्ये अडकलेल्या 30 नागरिकांचे वाचविले प्राण 


अकोला जिल्ह्यात 21 जुलै च्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर 22 जुलै च्या संध्याकाळपर्यंत पावसाची संतत सुरू होती. यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच NDRF च्या टीमनला काल एकुण 30 लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात यश आले आहे. 

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा

तेल्हारा तालुक्यातील विद्रूप नदीमध्ये आलेल्या पुरात पाथर्डी येथील चार व्यक्ती वाहून गेलेल्यापैकी तिघांना पंचगव्हाण येथे वाचविण्यात यश आले परंतु एक अटकळी येथे तलावामध्ये आज सकाळी मृत अवस्थेत मिळून आला. अकोला शहरातील खडकी परिसरात नागरी वस्तीत पाणी शिरल्याने येथील 16 नागरिकांना सायंकाळी सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे महत्त्व पूर्ण काम जिल्हा आपत्ती पथकाची चमूने केले आहे. एका 3 वर्षीय मुलीची प्रकृती खालावली असता मदतीसाठी सर्व मार्ग बंद होते. अशा संकटात सापडलेल्या मुलीच्या मदतीसाठी पुराच्या पाण्यातून वाट काढत अखेर आपत्ती व्यवस्थापनाची बोट धावली. प्रकृती नाजूक झालेल्या या चिमुकलीला वाचवण्यासाठी तिला बोटीतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्त्या, एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यांनी विविध ठिकाणावरून 8 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वाचविण्यात यश मिळवले. संपूर्ण जिल्ह्यात पुरामध्ये अडकलेल्या एकूण 30 नागरिकांचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचविल्यामुळे त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे 'जिल्ह्यातील सर्वच नद्या व नाले दुधळीभरून वाहत होत्या, त्यामुळे तेथील पूलांवरील व मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, परंतु आज जिल्ह्यातील सर्व वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 25 तारखेपर्यंत अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानी दिली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या