Ticker

6/recent/ticker-posts

मराठा महासंघ अकोला जिल्हाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी

मराठा महासंघ अकोला जिल्हाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी


अकोला : अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ति करण्यात आली. 


       महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, सरचिटणीस प्रकाश देशमुख व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी ही नियुक्ती केली असून आज पुणे येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या बैठकीत महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील व विनायकराव पवार यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सध्या या पदावर कार्यरत असलेले अविनाश पाटील नाकट यांनी त्यांच्या व्यावसायिक कारणास्तव या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.यावेळी केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी प्रमोद जाधव, आतिष गायकवाड, नागपूर विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहिते, अकोला महानगर अध्यक्ष श्रीकांत सरोदेसह राज्यातील 150च्या वर पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महासंघ,महिला आघाडी.युवक आघाडी तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहीती सचिन पाटील गोमासे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मीडिया अकोला जिल्हा यानी दिली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या