Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरात सदस्य जोडण्यासाठी मोहीम राबवणार - रफिक सिद्दीकी

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरात सदस्य जोडण्यासाठी मोहीम राबवणार - रफिक सिद्दीकी


अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी महानगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सदस्य जोडण्याची मोहीम राबवून राष्ट्रवादीचा पाया मजबूत करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी व्यक्त केला. शरदचंद्र पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महानगरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा जनाधार आहे. राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांना मानणारा एक वर्ग ग्रामीण आणि शहरी भागात आहे. या वेळी सिद्दीकी यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करून आगामी निवडणुकीतही आपला उत्साह व ताकद दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला. 


रफिक सिद्दीकी हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर 2012 मध्ये अकोला महापालिकेचे उपमहापौर म्हणून काम पाहत होते. 2007 साली मनपा स्थायी समिती सभापती म्हणूनही ते महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवत होते. प्रभाग क्रमांक 16 मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले असुन, पक्षातील अनेक पदांवर त्यांनी सेवा बहाल केली आहे. आतापर्यंत ते पक्षाचे प्रदेश संघटन सचिव म्हणून काम पाहत होते.तसेच ते महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते. त्यांची निष्ठा, परिश्रम, निष्ठा आणि पक्षाप्रती असलेली सेवा लक्षात घेऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची महानगराध्यक्षपदी निवड करून त्यांना सेवेची संधी दिली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हा व महानगर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या