लोकसंख्येनुसार अंगणवाडी स्थापन करण्याची मागणी
लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी सेवा आणि किशोरवयीन मुलींसाठी पूरक पोषणाची तरतूद करण्यासाठी अंगणवाडी स्थापन करण्याची मागणी मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर ने निवेदनातून केली आहे. कुपोषण आणि अशक्तपणा ही राज्यातील गंभीर समस्या आहे. भारत सरकारच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 नुसार, महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक मुले आणि महिला अशक्त आहेत. कुपोषण आणि अशक्तपणा यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंगणवाडीची विशेष भूमिका आहे. अंगणवाडी हे एक महत्त्वाचे समुदाय केंद्र म्हणून काम करत आहे. महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण व प्राथमिक शिक्षण सेवा पुरवते, परंतु आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार एकही अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्र असावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
यावेळी अंजुम नसरीन, शफिना बी, गौसिया बी, फरीदा अंजुम, एडवोकेट श्रीकांत वाहुरवाघ, हुसेन खान, आतीकउल्ला रहेमान आदी उपस्थित होते.
बाईट- अंजुम नसरीन, महीला
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या