थरार !रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला,भयंकर झटापट...नंतर
रानडुकराचा शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला;होते ते म्हणून बचावले...तरी शेतकरी गंभीर जखमी
तालुका प्रतिनिधी:- संतोष माने
मुर्तीजापुर :- दिनांक पाच जुलै 2023 वार बुधवार रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजता च्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर डुकराने अचानक हल्ला चढविल्याने शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार सविस्तर घटना अशी की,पाच जुलै रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास शेतकरी अशोक राऊत वय 60 राहणार चिखली कादवी हे आपल्या शेतात जात असताना सुभाष गोसावी व गुजर यांच्या शेताजवळ अचानक डुकराने हल्ला चढविला. यामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्याला इजा झाली तर पायाला व हाताला डुकराने गंभीर चावे घेत गंभीररित्या जखमी केले. शेतकऱ्यांने हातातील कुऱ्हाडीने डुकरावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण महाभयंकर डुकरासमोर ते कमी पडल्याने त्यांनी हल्लाकल्लोर केल्यामुळे कुत्रे भुकायला लागली व गुजर यांच्या शेतातील मजूर धावत येऊन डुकराला पांगविण्यात आले. अन्यथा मोठी जीवित हानी घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.शेतकऱ्याला तात्काल शेतातून बैलगाडीमध्ये टाकून मुर्तीजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.पण प्रकृती अवस्थेमुळे त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.
शासन,व्यापारी व आता अलीकडे जंगली प्राणी देखील शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी बसले आहेत का?असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही?वन विभागाने याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.पण झोपेचे सोंग घेतलेल्या वनविभाग कधी जागा होईल हे सांगता येत नाही. परंतु त्या अगोदर एखाद्या शेतकऱ्याचा प्राण जायला नको.सदरील घटना ही अतिशय गंभीर असून या ठिकाणी रहिवासी वस्ती असून शालेय विद्यार्थी पण याच रस्त्याने शाळेत जातात. सदर घटनेमुळे शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे शासनाने तथा वन विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.सदर घटनेची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या