ट्रॅव्हल्स मुळे झाला अपघात दुचाकीस्वार तलाठी यांचा मृत्यू
अकोला : शहरातील निमवाडी भागात उतरणारा उड्डाण पूल येथे आज शनिवारी सकाळी 9 ते 9.30 वा. खाजगी ट्रॅव्हलला तू चौकीस्वाराची धडक झाली. इंदुमती ट्रॅव्हल्स मुळे हा अपघात झाला असून शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
इंदुमती ट्रॅव्हल्स कंपनीची गाडी क्र एम एच ०९ई एम ७३४१ या गाडीच्या मागील भागजवळ असलेले टूल बॉक्स चे झाकण उघडले गेल्याने नीमवाडी भागात उड्डाण पुलावरून जात अपघात झाला असून यामध्ये शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हया घटनेनंतर खदान पोलिसांनी घटनास्थळ पोहचून अपघाताची माहिती घेऊन इंदुमती ट्रॅव्हल्स गाडी पोलिसांनी जप्त केली असून मृतक थोरात यांना उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे व पोलिस अधिक तपास करीत आहेत.



0 टिप्पण्या