वाहनाने जिवे मारण्याच्या प्रयत्नातून निर्दोष सुटका, मात्र शासकीय कामात अडथळा प्रकरणी शिक्षा , अन् शिक्षेला स्थगिती
अकोला. महसूल विभागाचे अधिकारी अवैध वाळूची तपासणी करत होते. दरम्यान, खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपीने चारचाकी वाहनाने हल्ला केल्याची फिर्यादीच्या आधारे मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात दाखल केले. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी खुनी हल्ल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली मात्र सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला 10 हजार रुपये दंड आणि दोन महिन्यांची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले. याच आरोपीला सुनावलेल्या शिक्षेपैकी 14 दिवस त्याने शीक्षा भोगली . या प्रकरणी आरोपींच्या वकिलांनी त्या शिक्षेबाबत अपील दाखल करण्याची याचिका दाखल केल्याने विद्य. न्यायाधीशांनी शिक्षेला स्थगिती देत आरोपींची जामिनावर सुटका केली.
अनभोरा येथील अजयकुमार पंजाबराव तायडे (४४) यांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ते त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत सोनारी फाट्याजवळ अवैध वाळू उत्खनन तपासत होते. तपासादरम्यान पकडलेल्या ट्रक क्रमांक एमएच 30 एबी 1644 चा चालक वाहन सोडून पळून गेला होता, दरम्यान, ट्रक मालक अब्दुल आसिफ अब्दुल कादीर याने खुनाच्या उद्देशाने एमएच 30 एएफ 2009 क्रमांकाच्या चारचाकीने वाहनाने अंगावर धावून जाऊन प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या अभियोगाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयात झाली, सरकारी बाजूने 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपपत्राच्या सुनावणीदरम्यान सर्व साक्षीदार त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी कलम 307 अन्वये आरोपीची निर्दोष सुटका केली आणि कलम 353 अन्वये दोन महिने कारावास आणि 10 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. यासोबतच न्यायालयाने न्यायालयीन कोठडीवेळी १४ दिवस कारागृहात असल्याने आरोपीला शिक्षा कमी करत. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबाबत आरोपीच्यावतीने ऍड नजीब शेख यांनी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर आरोपीला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देऊन त्याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे ऍड आनंद गोडे यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ऍड नजीब शेख यांनी बाजू मांडली.
0 टिप्पण्या