Ticker

6/recent/ticker-posts

संत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन रविवारी अमरावतीत

संत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन रविवारी अमरावतीत



    अकोला शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारधारेला वाहून घेतलेल्या अ भा मराठी साहित्य परिषद,पुणे द्वारा संत गाडगेमहाराज विद्यापीठ,अमरावती येथील कै के.जी.देशमुख सभागृहात रविवार दि २३ जुलै २०२३ रोजी राज्य स्तरिय, एकदिवसीय संत गाडगे महाराज साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. या मराठी साहित्य संमेलन साठी साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आज शिक्षक साहित्य साहित्य संघ,जिल्हा शाखा अकोला व अ भा म सा प चे अकोला जिल्हा समन्वयक सुरेश इंगळे आणि जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
,किशोर पेपर शॉपीच्या मागे अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला येथील सभागृहात संपंन पत्रकार परिषदेत हे आवाहन करण्यात आले आहे , साहित्या संमेलनाचे उद्घाटक डॉ अशोक सिरसाट, तर अध्यक्ष पुष्पराज गावंडे राहणार आहेत, ज्येष्ठ व सुप्रसिद्ध हास्य कवी हिंमत ढाळे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अमोल सिरसाट राहतील. कवी संमेलनाचे सुत्र संचालन कवी धिरज चवरे करतील ...अमोल गोंडचवर,निलेश कवडे,ऐजाज शेख,प्रवीण हटकर,संजय कावरे,निलेश देवकर,प्रशांत भोंडे,प्रशांत वरईकर...आदी कवी,गझलकार आपल्या रचना सादर करतील. पत्रकार परिषद व कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अकोला जिल्हाध्यक्ष मा राजकुमार भगत तथा सुरेश इंगळे जिल्हाध्यक्ष शिक्षक साहित्य संघ,अकोला तसेच मिलिंद इंगळे,योगिता वानखडे,संदीप वाकोडे,आकाश डाहेलकर,राजू चिमणकर,डॅा अर्जीन बी शेख युसूफ,सुरेश बोरकर,सुनिता इंगळे,शिला घरडे,निवृत्ती राऊत,विजय जितकर,स्नेहल अभ्यंकर, श्रीमती रेखाते ,जया उगले,भिकाजी भारती,काशिनाथ दाते....आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अमरावती येथील साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कवी,साहित्यिक, कलावंत तथा साहित्य प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येन हजर रहावे असे आवाहन सुरेश इंगळे आणि राजकुमार भगत यांनी केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या