Ticker

6/recent/ticker-posts

जनसंपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रमात विकास तिर्थ

जनसंपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रमात विकास तिर्थ


अकोला 
मूलभूत पाया उभारणीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा एनडीए सरकारने केल्यामुळे देशातील सर्व क्षेत्राचा विकास झाला अकोला मेडिकल कॉलेजची उभारणीसोबत अकोला मेन हॉस्पिटल ला 100 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्यामुळे कोविड-19 च्या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट कार्य अकोला मेन हॉस्पिटल मेडिकल कॉलेजनी केला तसेच मुर्तीजापुर या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली, जिल्ह्यातील तीर्थस्थळ सोबत दळणवळणाच्या सोयीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार व केंद्र सरकारने केल्यामुळे शहरातील मोठे मोठे रस्ते निर्माण झाले वाहतुकीला अडचण निर्माण होत नाही या विकास तीर्थाचा तसेच देशातील तीर्थस्थळाचा सवय विकास करून मानवता हे कार्य व मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच गरजाला विकास तीर्थ समजून निधी उपलब्ध करून दिला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले हे प्रत्येक देश प्रेमी नागरिकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


स्थानिक मेडिकल कॉलेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नऊ वर्षाच्या कालखंडात सेवा सुशासन तसेच लोक कल्याण महा जनसंपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रमात तीर्थ विकास स्थळाला भेट या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर मंचावर अनुप धोत्रे कृष्णा शर्मा डॉक्टर अमित कावरे डॉक्टर किशोर मालोकार विजय मालोकार महापौर अर्चनाताई मसने, संजय जीरापुरे संजय गोटफोडे माधव मानकर, चंद्रशेखर पांडे संतोष पांडे गुरुजी एडवोकेट देवाशिष काकड राजेंद्र गिरी सिद्धार्थ शर्मा अमोल गोगै निलेश निनोरे गणेश अंधारे शंकरराव वाकोडे प्रवीण हगवणे धनंजय धबाले हरीश आलम चंदाने सुमनताई गावंडे अंबादास उमाळे, आधी मंचावर विराजमान होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सबका साथ सबका विकास सोबत देशातील सर्वांगीण विकास व्हावा पूर्वोत्तर राज्यापासून तर महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी बारकाईने लक्ष ठेवून कार्यरत असून नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये भौगोलिक सामाजिक आर्थिक संस्कृती व सर्व क्षेत्राचा विकास करून देशाच्या अमृत महोत्सवामध्ये वर्षा काळाखंडामध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व योग दिवस 151 देशांमध्ये करून योग दिवस दिवसाचे महत्त्व अमेरिकेला पटवून देण्यासाठी अमेरिकेत च्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत आमंत्रण दिला आहे यावरून या देशाची संस्कृती या देशाचे विचार या देशाचे नेतृत्व सक्षम असल्याचीही आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले.


तुमची प्रास्ताविक डॉक्टर अमित कावरे संचलन एडवोकेटदेव आशिष काकड काकड तर यावेळी विजय अग्रवाल अनुप धोत्रे विजय मालोकार डॉक्टर किशोर मालोकार यांची भाषणे झाली. तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले. यावेळी डॉक्टर तसेच वेदकीय क्षेत्रातील तसेच नगरसेवक मध्ये मंडळ तसेच शहरातील विविध भागातील ग्रामीण भागातून विकास प्रेमी नागरिक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या