जिल्ह्यातील सिनेमाघरात सुरू असलेला आदीपुरुष हा चित्रपट हिंदुधर्मीयांच्या भावना दुखत असल्यामुळे बंद करण्यात यावा
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
अकोला जिल्ह्यातील सर्व सिनेमाघरातसुरू असलेला चित्रपट आदीपुरूष हा चित्रपट दाखवणे तात्काळ बंद करण्यात यावा कारण या सिनेमामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांच्याबाबत चूकीचे मुद्दे दाखवण्यात आले आहे त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व सिनेमाघरात हा चित्रपट दाखवला जाऊ नये अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईल ने तो सिनेमा बंद करू आणि यावेळी कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याला प्रशासन जबादार असेल असे इशारा निवेदन आज शिवसेना उध्दव बाळासाहेव ठाकरे पक्षाच्या वतीने राजेश मिश्रा यांचया नेतृत्वखाली जिल्हाधीकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आदीपुरुष हा चित्रपटमधील अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेतील संवादामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखत आहेत. कारण - सनातन धर्मांचा महान ग्रंथ रामायण बाबत अश्या विचित्र व कोणताही तर्क संगत नसलेल्या व सनातन धर्मियांच्या भावना दुखवणारे दृष्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या वित्रपाटा मथे मर्यादा ओलांड्न संवादाचे लिखान केलेले आहे.आणि अतिशय निष्कृष्ट दर्जाचे संवाद व एखाद्या वेब सिरीज सारखे निष्कृष्ट दर्जाच चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या चित्रपटामधे जे संवाद मांडण्यात आलेले आहे ते संवाद प्रभृश्रीराम यांनी कधीही म्हटलेले नाही, आणि श्री हनुमानजीनीही असे संवाद म्हटलेले नाही.असे संवाद सनातन धर्माचे कोणत्याही ग्रंथात आढळत नाही. किंवा याचे पुरावे नाही. श्री प्रभुरामचंद्राना मर्यादापुरुषोत्तम असे संबोधल्या जाते श्रीराम म्हणता बरोबर डोळयासमोर एक अतिशय वेगळे स्वरुप निर्माण होते. त्याच मर्यादापुरपोत्तमाच्या सर्वच मर्यादा या चित्रपटात ओलांडल्य गेल्या आहेत. त्यामुळे भावीपिढीस मर्यादापुर्पोत्तम
श्रीराम म्हणजे काय हे कसे सांगणार हे हिंदु संकृतीत बसन्यासारखे नाही. आणि येणांन्या भावीपिढीची दिशाभुल करणारा चित्रपट असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहा मधील या चित्रपटाचे सादरीकरण थांबविण्या करिता निवेदन दिले आहे सादरीकरण न थांबविल्यास शिवसेना पध्दतीने आदोलन करावे लागेल याची प्रशासनांने दक्षता घ्यावी. असे ही सांगण्यत आले यावेळी संतोष अनासने, गजानन चव्हान, नितिन ताकवले, शरद तुरकर, सागर भारुका, योगेश गीते,गजानन बोराळे, विजय परमार, मनोज बाविस्कर, सागर कुकडे, संतोष रणपिसे, ललित पांडे, सुनील दुर्गिया, रमेश मोटवानी, दीपक रोहडा, अमित भिरड, दीपक भंडारे, अजय सचदेवा, रोशन राज, गिरीश चावला, किरण येलवनकर, अभय खुमकर, किरण ठाकूर, दिनेश सरोदे, बाळु चव्हाण, मंगेश खंडेतोड, अंकुश गीते, मंगेश पावळे, प्रमोद माने, अर्जुन क्षीरसागर, विश्र्वास सिरसाठ, आशू तिवारी सुरेश इंगले, नारायण मानवतकर, सतीष नागदेवे, योगेश गवली, संजय अग्रवाल, निखिल पंजवानी, दत्ता पाटील, अमर भगत, विलास मुंडोकर, प्रमोद सोनतक्के, रूपेश ढोरे, विक्की ठाकुर, चेतन अग्रवाल आदी सह जनेक शिवसैनिकांची उपस्थिति होती
0 टिप्पण्या