Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिष्ठित घराण्यातील तीस वर्षीय महिलेची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या

प्रतिष्ठित घराण्यातील तीस वर्षीय महिलेची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या

प्रतीनीधी- संतोष माने

मुर्तीजापुर तालुक्यात शहरात व ग्रामीण भागात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.मागील काही दिवसात रेल्वे ट्रॅकवर सुद्धा आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.अशातच आज 20 जून रोजी तीस वर्षीय महिलेने रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना सकाळी 12 वाजताच्या सुमारास घडली.यामुळे शहर हादरून गेले आहे.


 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिक्षण सम्राट व दत्तरोग तज्ञ डॉक्टर कांबे यांच्या सुनबाई काजल संकेत कांबे वय 30 वर्ष या स्वतःची स्कूटर घेऊन चिखली गेटच्या रेल्वे ट्रॅक वर गेल्या असता पुणे अमरावती सुपरफास्ट रेल्वे येतात त्यांनी रेल्वे समोर उडी घेतली रेल्वेच्या जबर धडकेने काजल यांचा जागेवरच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे श्री गजानन आपत्कालीन पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले.आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात असल्याने सिटी पोलिसांची पंचनाम्याची कारवाई सुरू होती. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी पोलीस करीत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या