Ticker

6/recent/ticker-posts

व्हाट्सअप स्टेटस वरून बाबुळगाव मध्ये तणावपूर्ण शांतता एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आणली परिस्थिती नियंत्रणात

व्हाट्सअप स्टेटस वरून बाबुळगाव मध्ये तणावपूर्ण शांतता


एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आणली नियंत्रणात
     संपूर्ण बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा

छत्रपती शिवाजी महाराजांवर व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने रात्री बाबुळगाव मध्ये तनाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. व्हाट्सअप स्टेटस वरून गावात तनाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. बाबुळगावातील एका युवकाने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक वादग्रस्त स्टेटस ठेवल्याची माहीती गावातल्या काही तरूणांनी 16 जूनच्या रात्री दहा-साडेदहा वाजता च्या दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्या युवका विरोधात पोलीसांनी तक्रार दाखल करीत, घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीसांनी युवकाला मध्यरात्री अटक केली आहे. गावात सध्या संपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर उपस्थित असून कोणत्याही प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या