Ticker

6/recent/ticker-posts

अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुती आणि औरंगजेबाची कबरीला दिली भेटी

अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुती आणि औरंगजेबाची कबरीला दिली भेटी


सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला तसेच भद्रा मारुती मंदिरामध्ये ऐड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद जावेद कुरेशी तय्यब जफर युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड शहराध्यक्ष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात अनेकदा राजकारण रंगले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु असताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यामुळे राजकारण अजूनच तापलं आहे. एड.प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.


 ऐड  आंबेडकर यांची ही कृती राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात वंचित बहूजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर दोन दिवसीय संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याच दरम्यान खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेब यांच्या काबरीला आणि भद्रा मारुती मंदिराला त्यांनी भेट दिली. पर्यटन स्थळ असलेल्या  विविध ठिकाणी भेटी देणार असल्याचेही ते म्हणाले.  या मंदिराने आम्हाला खूप मदत केली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून खुलताबाद महत्त्वाचं ऐतिहासिक शहर आहे. या नावावरून जो काही भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे त्यांना मी एकच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं, ते कोणालाही मिटवता येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी इतिहासाचे दाखले देत स्पष्ट केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या