अकोला पुन्हा हादरले! दिव्यांग प्राध्यापकाची हत्या
अकोला शहरात बायपास चौक मध्ये पुन्हा हत्या, याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार जुना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास चौकात असलेल्या प्लायवूड सेंटरसमोर एसए कॉलेजमधील सेवानिवृत्त प्राध्यापक असलेले आणि सध्या साप्ताहिक पेपरचे पत्रकार म्हणून काम पाहणारे रणजित देवराव इंगळे वय 48, रा. गंगानगर येथील रहिवासी असून 17 जुन रोजी रात्री 11:30 ते 12:00 च्या सुमारास अज्ञात आरोपींनी डोक्यावर लोखंडी पाईप मारून अत्यंत निघृणपणे हत्या केली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
शहरातील एका महाविद्यालयामध्ये कार्यरत प्रा रणजीत इंगळे हे दिव्यांग असून, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहतात. शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. प्रा रणजीत इंगळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सुभाष दुधगावकर, डीवायएसपी सूरज गुंजाळ, जुने शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, एलसीबीचे प्रमुख संतोष महाल्ले यांच्यासह फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सर्वोच्च रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रा रणजीत इंगळे हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांचे कोणाशी काय शत्रुत्व असू शकते. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. या हत्याप्रकरणी जुने शहर पोलिस तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या