आयशर कंपनीला भीषण आग, आगीमध्ये लाखोचे नुकसान
अकोला शहरा लगत असलेल्या रिधोरा गावा जवळील आयशर कंपनीच्या सर्विस सेंटर येथे भीषण आग लागली. सायंकाळी पाचच्या सुमारास ही आग लागली . या आगीत दुरुस्ती साठी आलेल्या आवारात उभ्या असलेल्या तीन ट्रकला आग लागलीय.. यामुळे या तिन्ही गाड्यांचा मोठा नुकसान झाला आहे.अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहेय..ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नसून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही..
0 टिप्पण्या