55 वर्षीय अज्ञात महिलेची रेल्वे समोर येऊन आत्महत्या
मुर्तिजापूर प्रतिनिधी - संतोष माने
रेल्वे स्टेशन परिसरातील चिखली गेट जवळ डाऊन ट्रेन पट री पोल क्रमांक 619/06जवळ 55वर्षीय अज्ञात महिलेने धावत्या ट्रेन समोर जाऊन आपली जीवनयात्रा संपविली ची घटना सकाळी 10वाजे दरम्यान घडली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
प्राप्त माहितीनुसार मयूर बा घुरडे उप स्टेशन अधीक्षक मूर्तिजापूर यांचे कडून प्राप्त झालेल्या मेमो नुसार डाऊन ट्रेन 12811 सकाळी 09/45 वाजता पोल नंबर 619/06 चे जवळ पटरीवर एक अनोळखी महिला येऊन रेल्वे समोर उभी राहिली असता रेल्वेने कटून मृत्यू पावली आहे
मृतक अनोळखी अनोळखी महिलेचे वर्णन वय अंदाजे 50 ते 55 वर्ष, शरीर बांधा मजबूत, वर्ण गोरा, डोक्याचे केस काळे लांब कलर केलेले, अंगामध्ये ऑरेंज कलरची डिझाईनची साडी, हिरव्या रंगाचा पेटिकोट, गोल्डन रंगाचे डिजाईनचे ब्लाऊज, तिच्या एका कानामध्ये पिवळ्या धातूचे कानातले,उजव्या हातावर मराठीत सौ अलका नाव गोंदलेले आहे. तसेच रेल्वे पटरीवर तिच्या पायातील तुटलेली पांढऱ्या धातूची एक तोरडी व एक जोडवे तसेच गळ्यातील पिवळ्या धातूचे तुटलेले पेंडॉल, एक लाल रंगाचे लहान पर्स ज्यामध्ये नगदी 630 रुपये मिळून आले आहेत अश्या वर्णनाची महीलची अद्याप पर्यंत ओळख पटली नसल्याने महिलेचे प्रेत सरकारी दवाखाना मूर्तिजापूर येथे ओळख पटण्याकरिता राखून ठेवले आहे.
घटनेवरुन सिटी पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी 174सि आर पी सी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे



0 टिप्पण्या