Ticker

6/recent/ticker-posts

महानगरात ज्येष्ठ कबड्डीपटूंचा होणार भव्य गौरव सोहळा

महानगरात ज्येष्ठ कबड्डीपटूंचा होणार भव्य गौरव सोहळा


प्रणाम कर्तुत्वाला गौरव सोहळा समितीचे आयोजन,नऊ ज्येष्ठ कबड्डीपटूंचा होणार गौरव


अकोला- अकोला जिल्हा हा हरहुन्नरी कलाकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात या जिल्ह्यातील अनेक नररत्नांनी आपल्या विजयाचा अटकेपार झेंडा रोवून अकोल्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गतिमान केले आहे. कबड्डी या क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्याने अनेक नामांकित कबड्डीपटू निर्माण करून कबड्डी विश्वातही जिल्ह्याच्या डंका कायम वाजविला आहे. याच अनुषंगाने अशा हरहुन्नरी  कलाकार व खेळाडूंच्या गौरवासाठी नवगठीत प्रणाम कर्तुत्वाला गौरव सोहळा समितीच्या वतीने महानगरात प्रथमच अनेक वर्ष आपल्या कबड्डी ने क्रीडा क्षेत्राला नव संजीवनी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी कबड्डीपटूं च्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, माजी आमदार गजाननराव गुरुजी यांनी दिली. समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या अभिनव उपक्रमाची माहिती देण्यात आली. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सहकार महर्षी स्व.
डॉ. अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम साकार करण्यात आला आहे. दिनांक 26 जून रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात हा  ज्येष्ठ कबड्डीपटूंचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात जेष्ठ कबड्डीपटू माजी मंत्री गुलाबराव गावंडे, विजय मालोकार, ज्योतीताई कोकाटे,वासुदेवराव नेरकर, डॉ. राजकुमार  बुले, गजानन चीलात्रे, हरिभाऊ दांदळे, रामभाऊ अहिर,शंकरराव पाटील या नऊ कबड्डी रत्नांचा गौरव करण्यात येणार आहे. माजी आ. तथा छत्रपती अवॉर्ड चे विजेते तुकारामभाऊ बिरकड यांच्या अध्यक्षतेत संपन्न हा गौरव सोहळा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषराव उपाध्य दादासाहेब कोरपे, आ. नितीन देशमुख यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती अवॉर्ड विजेते नाजुकराव पखाले, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, माजी प्राचार्य सुभाषराव भडांगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात धनंजय मिश्रा संपादित नवरत्न कबड्डीचे या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात  प्रथमच होत असणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गौरव सोहळ्यात समस्त क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वागत अध्यक्ष संजय चौधरी, संयोजक दिलीप आसरे, निमंत्रक राजीव बोचे, धनंजय मिश्रा, गणेशराव पोटे ,दिवाकर गावंडे,कमलेश गावंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या