Ticker

6/recent/ticker-posts

भयंकर! पोलिस स्टेशनमधील डिटेक्टीव्ह ब्रांच मध्ये चाकू हल्ला

भयंकर! पोलिस स्टेशनमधील डिटेक्टीव्ह ब्रांच मध्ये चाकू हल्ला


शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमधील डिटेक्टिव्ह ब्रांच मध्ये तक्रारदार आणि गैरतक्रारदाराचे बयान पोलिस नोंदवत असताना एकाने दुसऱ्याच्या मानेवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली, या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर अजगर अली सिंकदर अली वय १७ वर्ष हा चष्मा विक्रीचे काम करतो. सोबतच तो नागपूर येथील एका फायनान्स कंपनीसाठी वसुली अधिकारी म्हणूनही काम बघतो. २७ मे रोजी संध्याकाळी त्याच्या दुकानासमोर एमएच ३० बीसी १८४४ क्रमांकाचा ऑटो उभा होता. त्या ऑटोचालकाने लोनचे पैसे भरले नाहीत असे अजगर अली सिकंदर अली याने ऑटोचालकाला हटकले. लोन भरले आहे उद्या कागदपत्र आणून दाखवतो, असे सांगून ऑटोचालक निघून गेला. त्यानंतर २९ मे रोजी दुपारी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये ऑटोचालक गेला आणि त्याने तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अजगर अली सिकंदर अली याला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.


पोलीस स्टेशन मधील डिटेक्टिव्ह ब्रांच मध्ये ऑटोचालक राहूल राजेंद्र कानडे हजर होता. पोलिसाने अजगर अली सिकंदर अलीचे बयान नोंदवणे सुरू केले असता, ऑटोचालकाने आपल्या जवळील चाकूने अजगर अलीचे मानेवर वार केला. तो पुन्हा वार करणार तोच अजगर अलीने चुकवण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्याचे हाताचे बोट कापल्या गेले. पोलिसांनी हल्लेखोर ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या