विधायक संमेलन भारत चे 3 दिवशीय आयोजन मुंबईत १५ जून पासून
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट,।पूणेतर्फे सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांचे आयोजन
अकोला : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन।आणि शांतताप्रिय समाज निर्माण।करण्यासाठी भारताच्या इतिहासात प्रथमच देशातील आमदार एकाच।मंचावर येणार आहेत. त्यासाठी मुंबईत १५ ते १७ जून या कालावधीत एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पूणेतर्फे 3 दिवशीय राष्ट्रीय विधायक संमेलन भारत'चे आयोजन केले असल्याची माहिती एमआयटी, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश।पाटील, यांनी आज अकोल्यात पत्रपरिषदेत दिली.
या संमेलनासाठी देशातील ४ हजार ५४९ आमदारांना निमंत्रित करण्यात आले।असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. एमआयटी -राष्ट्रीय सरपंच संसद पुणे अकोला जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील गाढवे . अकोला जिल्हा समन्वयक शिवशंकर वासुदेव पाटील , अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर व सर्व अकोला जिल्हा तालुका समन्वयक आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मिकतेचा, राष्ट्रीय।लोकशाहीच्या।सर्वांगीण सशक्तीकरणाचा आणि राष्ट्राच्या।सर्वागीण विकासाचा।शाश्वत।कृतिशील विचार देशातील विविध राज्यांनी स्वतंत्र व एककल्ली न करता त्यांचे राज्य म्हणून असणारे स्वातंत्र्य वैविध्य व जपत एकत्रित एकात्मिकपणे करणे अधिक व्यवहार्य ठरणार आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून या संमेलनाचे आयोजन केले आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी, तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व।संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनातून या संमेलनाची संकल्पना साकारली आहे. या संमेलनात एकूण 30 सत्रात विचार मंथन होणार आहे यासोबतच विश्वातील उद्योगपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच विविध विषयांवर चर्चा होणार आहे या संमेलनासाठी देशातील।साडेचार हजार आमदारांना निमंत्रित।करण्यात आले असून, आतापर्यंत २।हजार ८८ आमदारांनी उपस्थितीबाबत लेखी कळविले आहे. अशी माहिती सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले आहे यावेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील ,आमदार अमोल मिटकरी, अभय पाटील , एमआयटी -राष्ट्रीय सरपंच संसद पुणे अकोला जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील गाढवे . अकोला जिल्हा समन्वयक शिवशंकर वासुदेव पाटील ,अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर व सर्व अकोला जिल्हा तालुका समन्वयक पत्रकार परिषदसाठी उपस्थित होते
0 टिप्पण्या