Ticker

6/recent/ticker-posts

जुने शहर मधील झोपडपट्टी धारकांवरील अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर- आकाश शिरसाट

जुने शहर मधील झोपडपट्टी धारकांवरील अतिक्रमण कारवाई बेकायदेशीर- आकाश शिरसाट


झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घर देण्याची मागणी

   सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा

जुने शहर येथील ६० ते ७० वर्षे पुर्वीची, झोपडपट्टी धारकांचे घरावर अतिक्रमण मोहीम महानगरपालिका व पश्चिम झोन अकोला यांनी मोहिम थांबविण्याची विनंती सम्राट अशोक सेनेतर्फे केली आहे.  कल्याण कार्यालय ला लागुन मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेली झोपडपट्टी धारकांना नोटीस न देता बळजबरीने यांचे घर अतिक्रमण कारवाई महानगरपालिका आयुक्त यांनी राबवली आहे. अकोला महापालिका घर टॅक्स पावती,पाणी पट्टी पेड च्या पावत्या ईलेक्ट्रीक बिलचा नित्यनियमाने रहीवाशी करीत आहेत.  २६ मे २०२३ ला अकोला महापालिका अतिक्रमण विभाग चे कर्मचारी यांनी नोटीस न देता तोंडी घरे खाली करण्यास सांगितले आहे.
त्यामुळे येथील रहिवासी यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजच्या बेरोजगारी आणि महागाई च्या काळात घराचे छप्पर गेल्यास रहायचे कुठे अशा प्रतिक्रिया येत आहेत.


अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नुकताच मुंबई महापालिका येतील अनधिकृत घरांना पुणर्वसीत करण्याचे आश्वासन दिले तेव्हा मुंबई महापालिका ला एक नियम आणि अकोला महापालिका ला दुसरा नियम असा भेदभाव का? एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन देतात आणि दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील याच निर्णयाचे उल्लंघन करतात. झोपडपट्टी धारकांचे घर तोडण्यासाठी तीन दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत, राज्यघटनेनुसार कोणालाही बेघर करता येत नाही, झोपडपट्टी धारकांना मुदत दिल्या जाते, यांचं घर पाडल्यानंतर हे झोपडपट्टी धारक आपले लहान चिमुकले लेकरं घेऊन कुठे जातील? कोण यांना घर देणार? यांची झोपडपट्टी तुटल्यानंतर हे राहतील कुठे? पावसाळा तोंडावर आहे अशा परिस्थितीत आपला परिवार घेऊन कुठे जातील? गोरगरिबांच्या वेदना दुःख या प्रशासकीय व्यवस्थेला कधी दिसणार.  झोपडपट्टी धारकांसमोर जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील सरकार सर्वांना घर देणार, कोणीही बेघर राहणार नाही, परंतु घर तर मिळतच नाही,  राहते घर  सुध्दा सरकारच्या आदेशाने उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अकोला महानगरपालिका आयुक्त, अकोला जिल्हाधिकारी यांनी घरे पाडून झोपडपट्टी धारकांना उध्वस्त करण्याची मोहीम तात्काळ थांबविण्याची मागणी सम्राट अशोक सेने तर्फे करण्यात आली. झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घर देण्याची मागणी सुध्दा करण्यात आली.  यावेळी  मोठ्या संख्येने भिनगरातील नागरिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता मनोज शिरसाट, आकाश शिरसाट, आदित्य अंभोरे, निखिल शिरसाट, आकाश गवई व अन्यायग्रस्त झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या