शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैष्णवी यांनी मातृ शक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असल्याचे केले सिद्ध
अकोला
आपल्या नावाप्रमाणे अकोल्याचा तसेच परिवार चे नाव रोशन करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैष्णवी यांनी मातृ शक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असल्याचे सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले. अमरावती बोर्ड मधून तथा अकोल्यातून प्रथम पारित वैष्णवी जयेश नथवानी मार्क- ९९.३३ मिळवले आहे याबद्दल आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊ जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करावे शिक्षणाला महत्त्व असून घरातील एक व्यक्ती जर शिक्षित झाला तो संपूर्ण घर हा सगळ्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो शिक्षणाचे महत्त्व व स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येकाने ओळखून वाटचाल करावी अशी ही आमदार सावरकर याप्रसंगी म्हणाले आपल्या मतदारसंघातील विद्यार्थिनीने अमरावती विद्यापीठांमध्ये यश प्राप्त केला ही आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याची त्यांनी सांगितले मुलीचे वडील जयेश व आई हेमा नथवानी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत जयंत मसने अनुप धोत्रे गणेश अंधारे माधव मानकर शंकरराव वाकोडे एडवोकेट नितीन गवळी गोपाल मुळे श्रावण इंगळे विशाल इंगळे रूपाली जगताप प्रवीण जगताप मनीष बुंदिले, बाल टाले विजय इंगळे सुमन ताई गावंडे विनोद मापारी वानरे शारदा खेडकर चंदा शर्मा सारिका देशमुख माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड विद्याधर काकड सुरेश भागा नगरे वैकुंठ ढोरे राजेश वगारे सह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाणिज्य शाखेमध्ये त्या मुलीने यश मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
0 टिप्पण्या