Ticker

6/recent/ticker-posts

दंगलीमधील मृत्यु विलास गायकवाड यांचे खरे मारेकरी शोधा- वंचीत

दंगलीमधील मृत्यु विलास गायकवाड यांचे खरे मारेकरी शोधा- वंचीत


दि.१३ मे २०२३ रोजी रात्रीला अकोला शहरात जातीय दंगल निर्माण करणे दोन समाजात तेढ निर्माणकरून शांतता व सुव्यवस्था भंग करणा - या ख - या गुन्हेगारांना सोडून निरअपराध लोकांना गुन्ह्या मध्ये अडकविण्यात आले असल्याचा आरोप वंचितने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून त्याप्रमाणे या दंगलीमध्ये विलास महादेव गायकवाड गरीब व कष्टाळू कुटुंब प्रमुख यांचा नाहक बळी गेला. गायकवाड यांच्यापाठीमागे पत्नी व दोन मुले , एक मुलगी असा परिवार असून संपुर्ण परिवार हा दहशती खाली आहे . विलास गायकवाड यांचे मारेकरी कोण व त्यांच्या मारेक - यांना अद्यापर्यंत का पडकण्यात आले नाही अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे . खरे गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कार्यवाही करून शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रीत करावी. 


तसेच शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रशासनाला सहकार्य करेल असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले . तसेच पोलीस प्रशासनाने शॉट सर्किट मुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे मात्र तेथील परिस्थिती लक्षात घेता त्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी ही यावेळी वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषदेत केलीय, यावेळी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,महानगर निरीक्षक संतोष हुशे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे ,माजी मनपा गट नेते गजानन गवई,अजय शेगावकर , दीपक बोडखे,दिनकर खंडारे, किशोर जमणिक, विकास सदांशीव, नितीन सपकाळ शरद इंगोले, शंकर इंगोले, शंकर इंगळे, निशांत राठोड, मोहन तायडे आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या