Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकारात अपुरी माहिती दिल्याने दिव्यांग संतप्त

माहिती अधिकारात अपुरी माहिती दिल्याने दिव्यांग संतप्त


खेट्री येथील प्रकार : आमरण उपोषणाचा इशारा


पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे ग्रामपंचायत अंतर्गत अपंग ५ टक्के निधीची माहिती २०१८ ते २०२२ पर्यंत दिव्यांगाने मागितली होती, परंतु चक्क सचिवाने अपुरी माहिती पोस्टाने पाठवली, त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग अपील करणारे शेख आरीफ व दत्तात्रय ताले, यांनी थेट पातुरचे गट विकास अधिकारी यांच्याकडे धाव घेऊन अपील केली, त्यावर गटविकास अधिकारी  कार्यालयात ८ मे रोजी सुनावणी पार पडली ,परंतु सुनावणी दरम्यान अपील करणारे हजर व सचिवने दांडी मारल्याचे समोर आले, त्यामुळे माहिती अधिकाराचा उल्लंघन होत असल्याने माहिती मागणाऱ्या दिव्यांगाने थेट गट गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर पुढील सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.यावर काय कारवाई होते याकडे खेट्रीवासियांचे  लक्ष लागले आहे.


 
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या