परमविर सिंग यांचे निलंबन रद्दचा आदेश आरोपीला संरक्षण देणारा
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमंदिर सिंग यांचे निलंबन नुकतेच राज्य सरकारने परत घेतले, कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागीतला होता तो न दिल्याने कँटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारने कटला अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थीत करीत परमबीर सिंग यांचे निलंबन रद करण्याचा आदेश बेकायदेशीर व आरोपीला संरक्षण देणारा आहे.
बघा काय म्हणाले 👆 आ. अमोल मीटकरी
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमंदिर सिंग यांचे विरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये किमान 8 ते 10 गुन्हे दाखल असून यात खंडणी, कायदयाचा दुरउपायोग व बदल्यांमध्ये वसुली सारखे गंभीर घटनांची नोंद आहे. प्रसिध्द मुकेश अंबाणी यांच्या घरासमोर जे जिलेटीन ठेवण्यात आले त्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हो परमविर सिंगच आहे आणि त्यामुळे त्यांची खालच्या पदावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या NIA ने कोर्टात जे आरोपत्र दाखल केले आहे त्यात सुध्दा परमंदिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य रोल होता असे नमुद केले आहे. अंबाणी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदिप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने परमबिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असतांना सुद्धा त्यांच्यावर कारवाही न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे असे ताशेरे सुध्दा ओढले आहे..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमंबिर सिंग यांनी आरोप केले आणि ते फरार झाले. त्यांनी कोर्टात किंवा न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या समोर अनेक वेळा विचारणा करून सुध्दा कोणतेही पुरावे सादर केले नाही. उलट मी केवळ ऐकीव माहीतीवर हे आरोप केले असून याचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही असे शपथपत्र सादर केले. परंतु त्यांच्या खोट्या आरोपांवरुन अनिल देशमुख यांना 14 महिने तुरुगांत ठेवण्यात आले. न्यायालयाने जामीन देतांना अनिल देशमुख यांच्यावरील ऐकीव माहितीवर असून कोणतेही पुरावे नसल्याचे सांगीतले. परमबिर सिंग याचा राजकिय वापर करून अनिल देशमुख यांना फसविण्यात आले. परमबिर सिंग यांच्या मागे एका अदृश्य राजकिय शक्तीचा हात होता असा आम्ही वारंवार आरोप करीत होतो. कॅटला राज्य सरकारने अहवाल न देणे आणि कॅटने एकतर्फी दिलेल्या आदेशाचा वापर करीत राज्य सरकारने त्यांचे निलंबन रद्द करणे, यावरुन अनिल देशमुख यांना फसविण्यासाठी परमविर सिंग यांचा वापर कोणत्या अदृश्य हातांनी केला होता हे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या