पातुर येथे मराठी पत्रकार संघाची आढावा सभा संपन्न
प्रतीनीधी- नासीर शेख
पातूर : अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ द्वारा संचालित पातुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या आढावा सभेचे आयोजन दिनांक 13 मे 2023 रोजी पातुर तालुका अध्यक्ष अब्दुल कुद्दूस शेख यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार व संघटनेचे मार्गदर्शक शंकरराव नागरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पत्रकाराने पत्रकारिता करताना नागरिकांना त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या समुदायाबद्दल, समाजाबद्दल तसेच सरकार बद्दल समर्पित निर्णय घेण्याची आवश्यकता असलेली माहिती प्रदान करणे व जनतेला माहिती देण्यासाठी सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यात आणि कार्यरत लोकशाहीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पत्रकाराने बजावली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे यांनी केले.
मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अब्दुल कुद्दुस शेख, यांनी संघटनेचा हेतू व उद्देश सांगून ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी एकूण त्यावर उपाययोजना सुचवल्या. सभे दरम्यान नवीन सदस्य नोंदणी करून जुन्या सदस्यांचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप काळपांडे,उमेश देशमुख यांच्यासह मोहन जोशी श्रीकृष्ण शेगोकार,निखिल इंगळे, नासीर शेख,योगेश नागोलकर, नासीर शाह,सुमित भालतीलक, प्रमोद कढोणे,संगीता इंगळे,किरण कुमार, राहुल देशमुख,किरण निमकंडे,सय्यद साजिद हुसेन,सतीश सरोदे,गोपाल राठोड, शोएब शेख, यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या