Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य  शोभायात्रा


अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवींच्या २८९ व्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता अकोला शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा प्रमिलाताई ओक सभागृह परिसरातून निघाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाली. या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांसह आकर्षक चित्ररथ, विविध वेशभूषा साकारलेल्या झाक्या आकर्षक ठरल्या.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक केशवराव पातोंड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार हरिदास भदे, उद्घाटक जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, प्रमुख वक्ते म्हणून जळगावचे प्राचार्य सुनील पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक नारायण खानू मोटेदेसाई उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक दिनकर नागे (अकोला), मोहन पाथ्रीकर, श्याम घोंगे (तेल्हारा), महादेवराव साबे (बार्शीटाकळी), कैलास घोंगे (बाळापूर), आंतरराष्ट्रीय बॉक्सर दिया कैलास बचे, आदीचा शोभा यात्रेमध्ये सहभाग होता.




महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या