Ticker

6/recent/ticker-posts

नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा गावंडे यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन


नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा गावंडे यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन 

अकोला: 
गट ग्रामपंचायत रामगाव गोंदापूर मुजरे मोहमदपूर या गावांमध्ये सामाजिक सभागृह 2022 मध्ये मंजूर झाले असून आज दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा सारंगधर गावंडे यांच्या हस्ते नारळ फोडून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मुजरे मोहम्मदपुर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे प्रदीप बढे ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी या कामाची जबाबदारी घेतली ते दादाराव सुलताने तसेच ग्रामसेविका खडसे मॅडम व गावातील मंडळी विजय इंगळे तात्या इंगळे महादेवराव बढे देवानंद मेश्राम शेषराव गोपनारायण रमेश रायबोले अजय गावंडे ज्ञानेश्वर ताथोड व सर्व गावातील मंडळी उपस्थित होती.


              मुजरे मोहमदपूर या गावांमध्ये सामाजिक सभागृहामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद झडकत आहे कारण या आधी या गावांमध्ये समाज मंदिर बांधकाम झाले होते त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे ते पूर्णपणे शिकस्त झाले आहे त्यामुळे असा काही प्रकार यावेळेस घडू नये म्हणून गावातील सर्व मंडळी सज्ज असल्याचे संदीप इंगळे यांनी सांगितले तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ शोभा सारंगधर गावंडे यांनी सुद्धा सांगितले की गावातील सर्व विकासाचे कामे हे नियमानुसार होणार असल्याचे त्यांनी खात्री दिली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या